T20 World Cup 2021 साठी टीम इंडियाच्या जर्सीचे झाले अनावरण, पाहा फोटो

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसी ICC T20 World Cup 2021साठी टीम इंडियाची (Team India) नवीन जर्सी लाँच केली आहे.
T20 World Cup 2021 साठी टीम इंडियाच्या जर्सीचे झाले अनावरण, पाहा फोटो
Virat Kohli & Rohit SharmaTwitter/ ANI

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसी ICC T20 World Cup 2021साठी टीम इंडियाची (Team India) नवीन जर्सी लाँच केली आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), फलंदाज केएल राहुल, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह पाच भारतीय खेळाडू टीम इंडियाची नवीन जर्सी परिधान करताना दिसत आहेत. भारतीय संघ 24 ऑक्टोबरपासून टी -20 विश्वचषक 2021 मोहिमेला सुरुवात करणार आहे.

बीसीसीआयने सोशल मिडियावर शेअर केलेली नवीन जर्सी समोरच्या बाजूने गडद निळ्या रंगाची आहे. अशा प्रकारे या जर्सीला नवीन रुप देण्यात आले आहे. जर्सीचा रंग पारंपारिकपणे निळा आहे, परंतु नेहमीप्रमाणे त्यात केशरी रंगही जोडला गेला आहे. भगव्या रंगाच्या रेषा कॉलरच्या खालच्या भागात आणि बाजूला दिसतील, तर समोरच्या बाजूला भगव्या रंगात India लिहिलेले दिसेल.

Virat Kohli & Rohit Sharma
T20 World cup: आयसीसीने पहिल्यांदाच 'या' नियमाला दिला ग्रीन सिग्नल!

भारतापूर्वी श्रीलंका, नामिबिया, स्कॉटलंड, आयर्लंड आणि इंग्लंड या संघांनीही त्यांच्या जर्सीचे अनावरण केले आहे. श्रीलंकेने दोन जर्सी लाँच केल्या असल्या तरी मात्र बोर्डाने दोन जर्सी का? लाँच केल्या याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

Related Stories

No stories found.