INDvsENG : चौथ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रित बुमराह इंग्लंडसोबत होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आणि या सामन्यातून जसप्रित बुमराहने माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. जसप्रित बुमराहने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शेवटच्या कसोटीतून वैयक्तिक कारणामुळे माघार घेण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर त्याला परवानगी देताना बुमराहच्या जागेवर कोणताही नवा गोलंदाज रिप्लेस करणार नसल्याचे मंडळाने आज म्हटले आहे. 

विजय हजारे करंडक : गोव्याने साकारला पहिला विजय

जसप्रित बुमराहने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयला चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी वगळण्याचीविनंती केली होती. आणि त्यानुसार बुमराहला परवानगी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने आज दिली आहे. व त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या चौथ्या सामन्यात जसप्रित बुमराह भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसणार असल्याचे बीसीसीआयने आपल्या निवेदनात नमूद केले.    

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत पार पडले होते. आणि त्यात पहिला सामना पाहूण्या इंग्लंडच्या संघाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघावर 10 गडी राखून मोठा विजय मिळवला होता. व त्यासह चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2 - 1 ने आघाडीवर असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना महत्वपूर्ण राहणार आहे.  

चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ:

राट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव

संबंधित बातम्या