Team India New Jersey: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

Team India New Jersey: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

आगामी T20 विश्वचषक (T20 World Cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जवळपास सर्वच देशातील संघाची घोषणा झाली असून, भारतीय संघ देखील या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. तसेच, विश्वचषकासाठी नव्या जर्सीचे देखील आज अनावरण करण्यात आले.

Team India New Jersey: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण
2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिल्लीतील 123 मालमत्ता वक्फ बोर्डाकडे कशा सोपवल्या?

मागच्या विश्वचषकात देखील भारतीय संघ वेगळ्या जर्सीत मैदानावर उतरला होता. तसेच आता या वर्ल्ड कपसाठी पुन्हा एकदा भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे. भारतीय संघाच्या अधिकृत जर्सीचा एक प्रोमो प्रायोजकांनी पोस्ट केला. त्यानंतर आज संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या नव्या जर्सीत कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जिमी रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि शेफाली वर्मा दिसत आहेत.

आशिया चषकात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर विश्वचषकासाठी संघ पूर्णतयारीनिशी उतरेल अशी आशा चाहत्यांना आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला आहे. तर, जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com