जोकोविचची सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

जागतिक क्रमवारीत वर्षभर अग्रस्थान  कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाच्या सर्बियाचा नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या माजी टेनिसपटू पीट सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

लंडन : जागतिक क्रमवारीत वर्षभर अग्रस्थान  कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाच्या सर्बियाचा नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या माजी टेनिसपटू पीट सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  सॅम्प्रासने १९९३ ते१९९८ पर्यंत सलग सहा वर्ष आपले अग्रस्थान कायम रखले होते.   नोवाक जोकोविचने २०११, २०१२, २०१४, २०१५, २०१८ आणि २०२० वर्षांमध्ये क्रमवारीत सहावेळा अग्रस्थान कायम राखत विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

लहानपणापासूनच सॅम्प्रासचा खेळ पाहत मोठा झालो आहे., त्याच्यामुळेच मी या खेळाकडे वळलो, आता त्याच्या विक्रमाची बरोबरी करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे जोकोविच म्हणाला. 

संबंधित बातम्या