क्ले कोर्टचा बादशाह नदाल झाला १००० विजयांचा मानकरी

Tennis player Rafael Nadal completed 1000 victories
Tennis player Rafael Nadal completed 1000 victories

पॅरिस :  राफेल नदालने व्यावसायिक टेनिस स्पर्धेत एक हजार विजयांचा टप्पा पार केला. पॅरिस मास्टर्समध्ये हा टप्पा गाठत नदाल ही कामगिरी करणारा चौथा टेनिसपटू ठरला.

काही आठवड्यांपूर्वी विक्रमी १३ वे फ्रेंच ओपन जिंकलेल्या नदालपूर्वी जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर आणि इव्हान लेंडल यांनी ही कामगिरी केली. नदालने फेलिसिआनो लोपेझ याचा ४-६, ७-६ (७-५), ६-४ असा पराभव करीत हा टप्पा गाठला. त्याला हा टप्पा साजरा करण्यासाठी खास संधी देण्यात आली.
एक हजार विजयांचा टप्पा नक्कीच मोलाचा आहे. हा जादूई आकडा आनंददायक आहे. आता याचा आनंद साजरा करीत असताना चाहते नव्हते, पण स्पर्धा संयोजक, पदाधिकारी, बॉल बॉईज यांच्यासह तो साजरा केला. त्यांच्या उपस्थितीने माझा आनंद द्विगुणित झाला, असे नदालने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com