ENG vs IND यांच्यात रद्द झालेला कसोटी सामना पुढील वर्षी होणार

कसोटी (Test) सामन्याचे वेळापत्रक मान्य झाल्याचे समोर येत आहे. असेही मानले जाते की यामुळे ती मालिका पूर्ण होईल ज्यामध्ये भारत (India) 2-1 ने पुढे आहे.
ENG vs IND यांच्यात रद्द झालेला कसोटी सामना पुढील वर्षी होणार
भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ (Support staff) आणि प्रशिक्षकांना (Coach) कोरोनाची बाधा झाल्याले पाचवी कसोटी (Fifth Test) पुढे ढकलण्यात आली. आता हाच सामना पुढील वर्षी होणार आहे.Dainik Gomantak

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Association) पुढील वर्षी इंग्लंड (England) दौऱ्यावर 1 कसोटी सामना खेळणार आहे. याला दोन्ही क्रिकेट मंडळांनी दुजोरा दिला आहे. हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथील पाचव्या कसोटीची जागा घेईल. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये टीम इंडिया इंग्लंडमध्ये पाच कसोटींची मालिका खेळणार होती. चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे होता. भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ (Support staff) आणि प्रशिक्षकांना (Coach) कोरोनाची बाधा झाल्याले पाचवी कसोटी (Fifth Test) पुढे ढकलण्यात आली. आता हाच सामना पुढील वर्षी होणार आहे.

भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ (Support staff) आणि प्रशिक्षकांना (Coach) कोरोनाची बाधा झाल्याले पाचवी कसोटी (Fifth Test) पुढे ढकलण्यात आली. आता हाच सामना पुढील वर्षी होणार आहे.
ENG vs IND: ईसीबीला नुकसान भरपाई देण्यासाठी BCCIची मोठी ऑफर

हा सामना त्याच मालिकेचा भाग असेल किंवा एकटाच कसोटी सामना असेल. पण हा सामना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करेल. तसेच ईसीबी आणि बीसीसीआयमधील मतभेद दूर करण्यातही मदत होईल.

भारत मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी अपेक्षित होते की या कसोटीऐवजी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर दोन अतिरिक्त टी -20 सामने खेळेल. आणि पाचव्या रद्द झालेल्या कसोटी सामन्याची नुकसानीची भरपाई करेल. कसोटी सामन्याचे वेळापत्रक मान्य झाल्याचे समोर येत आहे. असेही मानले जाते की यामुळे ती मालिका पूर्ण होईल ज्यामध्ये भारत 2-1 ने पुढे आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाच कसोटींच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये अनिर्णित राहिला. यानंतर लॉर्ड्सवर टीम इंडियाने विजयी मोहर लावली. मात्र, इंग्लंडने लीड्समध्ये तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी केली. यानंतर भारताने साऊथम्प्टनमध्ये चौथी कसोटी जिंकत पुन्हा कमबॅक केले. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. पाचवी कसोटी मँचेस्टरमध्ये होणार होती, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com