कुचबिहार करंडक स्पर्धेत गोव्याची फलंदाजीतील घसरगुंडी कायम

मध्य प्रदेशविरुद्ध (Madhya Pradesh) 323 धावांच्या पिछाडीनंतर फॉलोऑनची नामुष्की पत्करल्यामुळे गोव्याची स्थिती बिकट आहे, कारण दुसऱ्या डावात त्यांनी शून्यावर एक गडी गमावला.
Goa

Goa

Dainik Gomantak 

पणजी : कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटातील गोव्याची घसरगुंडी अजूनही कायम आहे. मध्य प्रदेशविरुद्ध (Madhya Pradesh) 323 धावांच्या पिछाडीनंतर फॉलोऑनची नामुष्की पत्करल्यामुळे गोव्याची स्थिती बिकट आहे, कारण दुसऱ्या डावात त्यांनी शून्यावर एक गडी गमावला.

चार दिवसीय सामना सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्य प्रदेशने पहिला डाव कालच्या ४ बाद ३६६ धावांवरून ९ बाद ४९३ धावांवर घोषित केला. आर्यन देशमुख (११६) यानेही शतक नोंदविताना अभिषेक मावी (१६१) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली.

<div class="paragraphs"><p>Goa</p></div>
कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याविरुध्द मध्य प्रदेशने उभारली मोठी धावसंख्या

गोव्याच्या फलंदाजांचे अपयश कायम राहिल्यामुळे त्यांची एकवेळ ७ बाद ९७ अशी स्थिती होती. मात्र दीप कसवणकर (४५) व मनीष काकोडे (३५) यांनी आठव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला किमान १७० धावा केल्याचे समाधान लाभले. दुसऱ्या डावात सलामीच्या वीर यादव याला भोपळाही फोडता आला नाही, त्यामुळे बुधवारी बाकी नऊ विकेटसह गोव्याला खिंड लढवावी लागेल.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव : ११६.३ षटकांत ९ बाद ४९३ घोषित (अभिषेक मावी १६१, आर्यन देशमुख ११६, फरदीन खान २५-३-९३-३, लखमेश पावणे १४-३-५९-०, दीप कसवणकर २५.३-४-११५-४, मनीष काकोडे २२-१-८६-०, उदित यादव २३-०-९३-१, आर्यन नार्वेकर ६-०-२६-०, आयुष वेर्लेकर १-०-११-०).

गोवा, पहिला डाव : ५६.३ षटकांत सर्वबाद १७० (वीर यादव ५, आर्यन नार्वेकर ६, जुनेद सय्यद १, शिवेंद्र भुजबळ २५, कौशल हट्टंगडी ९, आयुष वेर्लेकर ०, उदित यादव ३८, दीप कसवणकर ४५, मनीष काकोडे ३५, लखमेश पावणे ६, फरदीन खान नाबाद ०, आर्यन पांडे १४-१, पृथ्विराजसिंग तोमर ४७-२, पारूष मंडल २७-१, सौमीकुमार पांडे ५०-३, युवराज नेमा ३२-३) व दुसरा डाव : २ षटकांत १ बाद ०.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com