गोव्याच्या मुलींचा संघ अवघ्या 37 धावांत हरला

19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात दिल्लीचा 7.2 षटकांतच विजय
गोव्याच्या मुलींचा संघ अवघ्या 37 धावांत हरला
क्रिकेट Dainik Gomantak

पणजी: पावसामुळे षटके कमी करण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाला वातावरणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांचा डाव अवघ्या 37 धावांत गारद झाला. त्यानंतर दिल्लीने विजयी लक्ष्य सहजपणे गाठताना 7.2 षटकांत फक्त दोन विकेट गमावल्या.

सामना गुरुवारी सिव्हिल लाईन्स-नागपूर (Civil Lines) येथील VCA स्टेडियमवर झाला. LT B गट स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. पावसाच्या प्रभावामुळे सामना प्रत्येकी २५ षटकांचा करण्यात आला. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण हा निर्णय साफ उलटला. त्यांच्या एकाही बॅट्सवूमनला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. सहा जणींना भोपळाही फोडता आला नाही. सावली कोळंबकर हिने सर्वाधिक नऊ धावा केल्या. दिल्लीच्या मधू आणि माधवी बिधुरी यांनी प्रत्येकी तीन, तर पारुनिका सिसोदिया हिने दोन विकेट मिळविल्या.

क्रिकेट
Goa Futsal: आंबेली, पणजी फुटबॉलर्सचे वर्चस्व

दिल्लीच्या डावातील पहिल्या चेंडूवर सावली कोळंबकरने गोव्यास यश मिळवून दिले, पण आव्हान सोपे असल्याने दिल्लीचे (Delhi)नुकसान झाले नाही. दोन विकेट गमावून आठव्या षटकातच त्यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com