पावसामुळे गोव्याची मोहीम लांबली !

पुदुचेरीतील (Puducherry) पावसामुळे गोव्याची (Goa) 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम दोन दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आली.
पावसामुळे गोव्याची मोहीम लांबली !
CricketDainik Gomantak

पणजी: पुदुचेरीतील (Puducherry) पावसामुळे गोव्याची (Goa) 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम दोन दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) एलिट ब गटाचे वेळापत्रक बदलले असून सामने शनिवारऐवजी ऐवजी सोमवारपासून खेळले जातील.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) सचिव विपुल फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुदुचेरीत सध्या पाऊस आहे. त्यामुळे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहे. गोव्याचा संघ आता 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत सलग पाच सामने खेळेल. अगोदर ही स्पर्धा 20 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार होती.

Cricket
पेडणे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंची निवड

बदललेल्या वेळापत्रकानुसार सुयश प्रभुदेसाईच्या (Suyash Prabhudesai) नेतृत्वाखालील गोव्याचा संघ रेल्वेविरुद्ध 22 रोजी पहिला सामना खेळेल. नंतर हरियाना (23 नोव्हेंबर), दिल्ली (24 नोव्हेंबर), राजस्थान (25 नोव्हेंबर), पंजाब (26 नोव्हेंबर) या संघांविरुद्ध गोव्याचे सामने होतील. हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार, पुदुचेरीत पुढील आठवड्यातील पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सामने प्रभावित होण्याचे संकेत आहेत. बीसीसीआय संकेतस्थळानुसार, एलिट विभागातील अन्य गटातील सामने शनिवारपासून खेळले जातील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com