भारतीयांना संधी देणारी आयएसएल आजपासून; देशी खेळाडूंच्या संख्येत वाढ

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धा आठव्या मोसमात पदार्पण करताना भारतीय फुटबॉलपटूंना जास्त संधी देणारी असेल.
भारतीयांना संधी देणारी आयएसएल आजपासून; देशी खेळाडूंच्या संख्येत वाढ
ISLDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धा आठव्या मोसमात पदार्पण करताना भारतीय फुटबॉलपटूंना जास्त संधी देणारी असेल. यंदापासून स्पर्धेतील देशी खेळाडूंची संख्या वाढली असून मैदानावरील प्रत्येक संघात सात भारतीय असतील. स्पर्धा शुक्रवारपासून गोव्यात (Goa) खेळली जाईल. सामने तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात होतील.

स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी गतउपविजेता कोलकात्याचा एटीके मोहन बागान आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात खेळला जाईल. कोरोना विषाणू महामारी कारणास्तव सलग दुसऱ्या मोसमात स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर होत आहे. गतमोसमात आयएसएल करंडक, तसेच लीग विनर्स शिल्ड पटकावलेल्या मुंबई सिटी एफसीची पहिली लढत सोमवारी होईल. त्यांच्यासमोर माजी लीग विनर्स एफसी गोवाचे आव्हान असेल. स्पर्धेतील सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमव्यतिरिक्त बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर खेळले जातील.

ISL
Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) नियमानुसार, आयएसएल स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड ( FSDL) यांनी स्पर्धेच्या नियमात बदल करताना परदेशी खेळाडूंची संख्या घटविली आहे. मैदानावरील अंतिम अकरा सदस्यीय चमूत सात भारतीय, तर चार परदेशी खेळाडू असतील. स्पर्धेसाठी प्रत्येक संघ सहा परदेशी खेळाडूंना करारबद्ध करू शकतो, त्यापैकी एक खेळाडू एएफसी सदस्य देशाचा असेल. शिवाय भारतातील चार डेव्हलपमेंटल खेळाडूंपैकी दोघांना सामन्यात खेळविणेही बंधनकारक असेल.

‘दुहेरी’ विजेता होईल मालामाल

स्पर्धेत साखळी फेरीअंती अव्वल ठरणारा संघ लीग विनर्स शिल्डचा मानकरी ठरेल आणि या संघास एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. लीग विनर्स संघाने आयएसएल करंडकही जिंकल्यास त्यांना एकत्रित 9.5 कोटी रूपये मिळतील. लीग विनर्स शिल्डसाठी 3.5 कोटी रुपये, तर आयएसएल करंडक विजेतेपदासाठी सहा कोटी रूपये मिळतील. आयएसएल करंडक उपविजेत्या संघाला तीन कोटी रूपये, तर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या अन्य दोन संघांना प्रत्येकी 1.5 कोटी रूपये मिळतील. स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम 15.5 कोटी रुपये आहे.

ISL
Goa Police Cup Football स्पर्धेत धेंपो, एफसी गोवा उपांत्य फेरीत !

‘लेट नाईट’ सामने होणार

यंदाच्या आयएसएल स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धेत प्रथमच काही सामने रात्री उशिरा खेळले जातील. रात्री साडेनऊ वाजता सामना खेळविला जाईल. पहिला ‘लेट नाईट’ सामना 27 नोव्हेंबरला मुंबई सिटी एफसी व हैदराबाद एफसी यांच्यात खेळला जाईल. नियमित सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील.

आयएसएल 2021-22 मधील संघ

मुंबई सिटी एफसी, एटीके मोहन बागान (कोलकाता), नॉर्थईस्ट युनायटेड (गुवाहाटी), एफसी गोवा, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, बंगळूर एफसी, चेन्नईयीन एफसी, ईस्ट बंगाल (कोलकाता), केरळा ब्लास्टर्स, ओडिशा एफसी.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com