Goa Sports Update: कठीण परिस्थितीतील खेळाडूंची व्यावसायिकता स्पृहणीय: डेरिक

खेळाडूंनी कठीण परिस्थितीत प्रदर्शित केलेली व्यावसायिकता स्पृहणीय ठरली. प्रशिक्षक या नात्याने खेळाडूंचा अभिमान वाटतो, असे मत मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा (Derrick Pereira) यांनी व्यक्त केले.
Goa Sports Update: कठीण परिस्थितीतील खेळाडूंची व्यावसायिकता स्पृहणीय: डेरिक
Goa Sports Update: Derrick PereiraDainik Gomantak

Goa Sports Update: खेळाडूंनी कठीण परिस्थितीत प्रदर्शित केलेली व्यावसायिकता स्पृहणीय ठरली. प्रशिक्षक या नात्याने खेळाडूंचा अभिमान वाटतो, असे सांगत मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा (Derrick Pereira) यांनी एफसी गोवा संघातील खेळाडूंची पाठ थोपटली. कोविड (Covid-19) परिस्थितीमुळे संघाचे काही प्रमुख खेळाडू अनुपलब्ध ठरल्यानंतर संघाने जिगर प्रदर्शित करत इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडला पिछाडीवरून शुक्रवारी रात्री 1-1 गोलबरोबरीत रोखले.

Goa Sports Update: Derrick Pereira
Election Commission: का वाढली उमेदवारांची चिंता?

‘‘प्रतिकुल परिस्थितीत व्यावसायिकता प्रदर्शित करणे अवघड असते. प्रमुख प्रशिक्षक या नात्याने माझ्या कारकिर्दीतील हा आव्हानात्मक टप्पा आहे,’’ असे डेरिक यांनी सामन्यानंतर सांगितले. डिसेंबर महिन्यात हुआन फेरांडो यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर डेरिक यांनी एफसी गोवाची (FC Goa) जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवास सलग दुसरा विजय हुकला, पण तिसरी बरोबरी नोंदविली. ‘‘कालच्या निकालाने मी निराश झालोय, पण आमच्या खेळाडूंच्या मेहनतीसाठी अतिशय आनंदी आहे. कठीण समयी त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता अभिमानास्पद आहे,’’ असे डेरिक म्हणाले.

Goa Sports Update: Derrick Pereira
Goa Elections: ..त्यामुळे भाजपवर कारवाई झालीच पाहिजे; टीएमसीची मागणी

एफसी गोवा संघात कोविड बाधित

‘‘आमच्या शेवटच्या सराव सत्रापूर्वी दोघे खेळाडू चाचणी कोविड बाधित असल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या खेळाडूंनाही विलगीकरणात जावे लागले. सामन्यासाठी हॉटेलमधून निघत असताना एदू बेदिया आणि इव्हान गोन्झालेझ यांची चाचणीही पॉझिटिव्ह आली. आमच्यासाठी खरोखरच ते क्षण खडतर होते. त्यामुळे स्टेडियमवर आल्यानंतर आम्हाला नव्याने सामन्यासाठी खेळाडूंची यादी तयार करावी लागली. शेवटच्या क्षणापर्यंत अकरा सदस्यीय संघात कोण खेळणार याबाबत आम्हीच अनभिज्ञ होतो. संपूर्ण आठवडाभर सराव न केलेल्या खेळाडूचाही सामन्याच्या यादीत समावेश करावा लागला,’’ असे डेरिक नॉर्थईस्टविरुद्धच्या सामन्यापूर्वी उद्‍भवलेल्या परिस्थितीविषयी म्हणाले. शुक्रवारी रात्री खेळाडूंनी धैर्याने मैदानावर उतरत आमच्यासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली, पण अशी परिस्थिती पुन्हा उद्‍भवणार याचीच आशा बाळगतो, असे डेरिक यांनी शेवटी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com