बॉलिवूडचे पार्श्वगायक मोहित चौहान यांनी गायलं ऑलिम्पिक स्पर्धेचे थीम सॉंग

बॉलिवूडचे पार्श्वगायक मोहित चौहान यांनी गायलं ऑलिम्पिक स्पर्धेचे थीम सॉंग
Tokyo Olympics

टोकियो ऑलिंपिकला(Tokyo Olympics) एक महिना बाकी राहिलेला आहे. जपानमध्ये अनेक संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय संघाची देखील ऑलिंपिकसाठी लवकरच जपानकडे रवाना होणार आहे. त्या आधी आज ऑलिंपिकचे थीम साँग लाँच(theme song) करण्यात आले आहे. क्रिडा मंत्री किरण रिजिजू(kiren rijiju) यांच्या उपस्थितीत या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले. मोहीत चौहान यांनी याला गायले आणि संगीतबध्द केले आहे.

यंदाच्या ऑलिंपिकवर कोरोनाचे सावट असले तरी भारतीय संघाकडून यंदा जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा आहे. भारताकडून एकूण 101 खेळाडू 14 प्रकारात ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहेत. यात हॉकी, धनुर्विद्या, अँथलेटीक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी, गोल्फ, जिमन्यास्टीक, रोईंग, सेलिंग, शुटींग, टेबल टेनिस, रेसलिंग आदी प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. 

ऑलिंपिकवर कोरोनाचे सावट 
मागील वर्षी होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 23 जुलै पासून जपानमध्ये सुरु होत आहे. यासाठी जपानच्या सरकारने देखील तयारी केली आहे. जपान विमान तळावर खेळाडू प्रशिक्षकांसह सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. युगांडा संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आल्याने सर्वांमध्ये एकप्रकारे धास्तीचे वातावरण आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com