IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात दोन मोठे बदल!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. दोन्ही संघांचा ताफा केपटाऊनमध्ये होत आहे.
IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात दोन मोठे बदल!
Team IndiaDainik Gomantak

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. दोन्ही संघांचा ताफा केपटाऊनमध्ये असून जिथे मालिकेतील शेवटची किंवा निर्णायक कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) इतिहास बदलण्यासाठी भारताला ही कसोटी जिंकावीच लागेल. तत्पूर्वी, या शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये (Team India) कोण असणार आणि कोणाचं पत्ता कट होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण त्याआधी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर केपटाऊनमधून (Cape Town) एक मोठी बातमी समोर येत आहे.

दरम्यान, केपटाऊन कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल संघाच्या मधल्या फळीशी संबंधित आहेत. आणि, संघात होणारे हे दोन्ही बदल धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.

Team India
IND vs SA: ‘भारत को मेरी हड्डियां तोड़नी होंगी’, डीनच्या वचनाचा वडिलांकडून खुलासा

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल!

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या शेवटच्या सामन्यादरम्यान टीम इंडियामध्ये कोणते बदल होतायेत, ज्यावर सध्या अटकळ आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रुपात संघात पहिला बदल होऊ शकतो, तोही अपेक्षित आहे. विराट संघात असल्याने हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागू शकते. पाठीच्या दुखण्यामुळे विराट जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना खेळू शकला नव्हता.

संघातील दुसरा बदल गोलंदाजीच्या आघाडीवर होऊ शकतो. इथे इशांत शर्माला संघात मोहम्मद सिराजची जागा मिळू शकते. जोहान्सबर्गमध्ये (johannesburg) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत सिराजला दुखापत झाली, त्यामुळे त्याला केपटाऊन कसोटीतून बाहेर व्हावे लागले. इशांतकडे 100 हून अधिक कसोटी खेळण्याचा आणि 300 हून अधिक बळी घेण्याचा अनुभव आहे, जो केपटाऊनमध्ये टीम इंडियासाठी उपयुक्त ठरु शकतो, असं संघ व्यवस्थापनाचे मत आहे.

केपटाऊन कसोटीसाठी भारताची संभाव्य इलेव्हन

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (Captain), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, इशांत शर्मा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com