IND vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ''हे'' 11 खेळाडू उतरणार मैदानात

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

डब्ल्यूटीसी फायनल्समधील भारताचा संभाव्य संघ 

विराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया 2 जून रोजी चार महिन्यांच्या इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. सर्व खेळाडू बुधवारी मुंबईत एकत्र जमतील. आणि तेथून 24 सदस्यीय संघ इंग्लंडला (England) रवाना होईल. तत्पूर्वी सर्जरी केलेला के.एल. राहुल आणि वृध्दिमान साह या टीमबरोबर जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये. साहाच्या अलीकडेच कोविडच्या (COVID-19) दोन चाचण्या झाल्या आहेत. त्यात एक निगेटिव्ह आली तर दुसरी पॉझिटिव्ह आली होती. या दोघांसाठी इंग्लंडला जाणे तंदुरुस्तीवर अवलंबून असेल असेही बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे. अशा परिस्थितीत या दोघांसमोरही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचे आवाहन असणार आहे.(These 11 players will be on the field for the World Test Championship)

I-League: फुटबॉल स्पर्धेतून यंदा बढती रद्द होण्याचे संकेत

काही खेळाडूंच्या निवडीबद्दल चाहत्यांमध्ये खूप चर्चा आहे. उदाहरणार्थ, पृथ्वी शॉ संघात निवडला गेला नाही, तर काही खेळाडूंची संघात निवड चकित करण्यासारखी होती. त्याचबरोबर सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तिसर्‍या विकेटकीपरची कोणतीही व्यवस्था नाही. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळण्यापूर्वी टीम विराट जूनच्या तिसर्‍या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनलही खेळेल. अशा परिस्थितीत मीडिया आणि क्रिकेटचे चाहते अंतिम फेरीत कोणती भारत कोणती इलेव्हन घेऊन उतरेल या गणितामध्ये व्यस्त आहेत. तथापि, सुत्रांद्वारे मिळालेल्या वृत्तानुसार, खालील संभाव्य संघ अंतिम सामन्यात खेळण्याची अपेक्षा आहे.

IPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले

दरम्यान, आयसीसीने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Champoinship) अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. मुख्य निवड समितीने चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात 20 खेळाडूंची निवड केली होती. यात 6 वेगवान गोलंदाज तसेच 3 फिरकी गोलंदाज आहेत. दुखापतीनंतर रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचे संघात पुनरागमन झाले आहेत, तर हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांना निवड समितीने दुर्लक्ष केले. भारत आणि न्यूझीलंड (India vs Newzealand) यांच्यात 18 जून रोजी कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामना होईल. हा सामना साऊथॅम्प्टनमधील दि एजेस बाउल स्टेडियमवर खेळला जाईल

डब्ल्यूटीसी फायनल्समधील भारताचा संभाव्य संघ 
विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे (उपकप्तान), शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विेकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी और इशांत शर्मा.

संबंधित बातम्या