IND vs SL: टीम इंडियात केएल राहुलची जागा घेऊ शकतात 'हे' 5 युवा क्रिकेटर

केएल राहुलसाठी पर्याय ठरू शकणाऱ्या ५ क्रिकेटर्सबद्दल जाणून घ्या.
KL Rahul
KL RahulDainik Gomanatak

Team India: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण या मालिकांसाठी केएल राहुलला संधी न मिळण्याची शक्यता आहे.

सध्या अशी चर्चा आहे की केएल राहुलने त्याच्या लग्नानिमित्त सुटीची मागणी केली होती. त्याचमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी अनुपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तो या मालिकांमध्ये खेळला नाही, तर भारताकडे त्याच्या जागेवर खेळवण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत.

वनडे मालिकेत तरी सलामीला रोहित शर्मासह शिखर धवन येण्याचीच शक्यता दाट आहे, तसेच मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत अशा खेळाडूंना संधी मिळू शकते. पण टी20 मालिकेसाठी केएल राहुलची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. त्याचसाठी काही पर्यायी खेळाडूंवर नजर टाकू.

KL Rahul
Team India: बांगलादेशविरुद्ध कसोटी तर जिंकली, पण टीम इंडियासमोर उभे राहिलेत 'हे' यक्षप्रश्न

1. पृथ्वी शॉ -

पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळताना गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत त्याच्याकडे लक्ष वेधले होते. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्येही मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचाही श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विचार होऊ शकतो.

2. संजू सॅमसन -

यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो केएल राहुलला पर्याय ठरू शकतो. त्याने यापूर्वी 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये सलामीलाही फलंदाजी केली होती, ज्यामध्ये मिळून त्याने 105 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो सलामीला किंवा मधल्या फळीतही केएल राहुलच्या जागेवर खेळू शकतो.

KL Rahul
Boxing Day Test नक्की आहे तरी काय अन् टीम इंडियाचा याच्याशी कसा संबंध?

3. शुभमन गिल -

युवा सलामीवीर शुभमन गिलने गेल्या काही महिन्यांत भारताकडून जेव्हाही संधी मिळाली आहे, त्यावेळी त्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने बांगलादेश दौऱ्यातही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचाही विचार केएल राहुलचा पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.

4. ऋतुराज गायकवाड -

25 वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडही सलामीसाठी चांगला पर्याय आहे. त्याने काहीदिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्रासाठी दमदार कामगिरी केली होती. याच स्पर्धेत त्याने 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचाही कारनामा केला होता. तो देखील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

5. ईशान किशन -

यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशविरुद्ध वनडेत द्विशतक झळकावले होते. त्याच्याकडे आक्रमक फलंदाजीचीही क्षमता आहे. तसेच तो डावखरी फलंदाज असल्याने त्याचाही फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com