गोव्यातील हे महाविद्यालय आहे कृत्रिम टर्फ फुटबॉल मैदानाच्या प्रतिक्षेत

सद्या सिंथेटीकअॅथलेटीक ट्रॅक (Athletic track) व कृत्रिम टर्फ फुटबॉल (Artificial football turf) मैदान या दोन्ही प्रकल्पांसाठीची पूर्व तयारी झाली आहे
Image for representational use
Image for representational useUnsplash

फातोर्डा: सद्या सिंथेटीकअॅथलेटीक ट्रॅक (Athletic track) व कृत्रिम टर्फ फुटबॉल (Artificial football turf) मैदान या दोन्ही प्रकल्पांसाठीची पूर्व तयारी झाली असुन जीएसआयडिसी तर्फे हे काम पुर्ण करण्यात येईल. त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे क्रिडा व शारिरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. राजन मॅथ्यू यांनी सांगितले.

केपे येथील शासकीय महाविद्यालयाला गतसाली 30 वर्षे पुर्ण झाली. या 30 वर्षांत या महाविद्यालयाने क्रिडा क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असे नाव कमवले आहे. या महाविद्यालयाने अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय फुटबॉलपटू अॅथलिट तयार केले. 

महाविद्यालयाची विद्यार्थिनी मिशेल कास्तानाने उत्तर कोरियातील एएफसी कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. आल्बिन गोम्स हा सुद्धा फुटबॉलपटू एएफसी कप स्पर्धेत खेळला. सोनाली मलिकने बेसबॉलमध्ये, फ्रांसिस क्लेमेंतने 21 किमी मॅरॅथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धाृमध्ये खेळण्याचा मान मिळविला.

Image for representational use
Lionel Messi आणि बार्सिलोना एक अविस्मरणीय नातं

जर हे दोन्ही प्रकल्प पुर्ण झाले तर अशा प्रकारची मैदाने असणारे हे भारतातील पहिली उच्च शैक्षणिक संस्था ठरेल. या दोन्ही प्रकल्पासाठी महाविद्यालयाकडे जमीन उपलब्ध आहे. केपे व कुडच़डे येथील स्थानिक आमदारांना या दोन्ही प्रकल्पांची माहिती असुन उच्च शिक्षण संचालनालयाने रुसा खाली निधी उपलब्ध केला आहे.

Image for representational use
गोव्याची हॉकी पिछाडीवर

केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत हे दोन्ही प्रकल्प आहेत. एरव्ही या दोन्ही प्रकल्पांना एव्हांना सुरुवात होणार होती, पण कोविड महामारीमुळे सर्वच कामे खोळंबली आहेत.

या महाविद्यालयात केपे, सांगे, काणकोण, कुडचडे या भागातील मुले शिकतात. काही विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा प्रकल्पांमध्ये प्राविण्य मिळवलेले आहे. मात्र त्यांना सराव व प्रशिक्षणासाठी पेडे, बांबोळी येथे जावे लागते. जर हे प्रकल्प पुर्ण झाले तर संपुर्ण दक्षिण गोव्यातील खेळाडुंची उत्तम सोय होईल व याच्यापेक्षा जास्त राष्ठ्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास हातभार लागेल असे डॉ. मॅथ्यू यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com