
Cricket: 24 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी 1999 ला भारतीय क्रिकेटपटू दिग्गज बॉलर अनिल कुंबळेने इतिहास रचला होता. पाकिस्तानबरोबरच्या टेस्ट मॅचमध्ये त्यांनी हा इतिहास रचला होता.
अनिल कुंबळेने या टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या होत्या. असा इतिहास रचणारे अनिल कुंबळे जगातील दुसरे क्रिकेटपटू ठरले होते. याआधी इंग्लडच्या ऑफ स्पिनर जिम लेकर ने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 विकेट घेऊन इतिहास रचला होता.
2021 मध्ये जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर मुंबईमध्ये भारताविरुद्ध न्यूझिलंड( New Zealand )च्या एजाज पटेलने असाच विक्रम आपल्या नावावर केला आहे.
4 ते 7 फेब्रुवारी 1999ला झालेली मॅच तत्कालीन फिरोजशाहा कोटला स्टेडियम ( सध्याचे अरुण जेटली स्टेडिअम ) खेळली गेली. या मॅचमध्ये लेग स्पिनर अनिल कुंबळेंनी 26.03 ओव्हरमध्ये 74 धावा देऊन 10 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.
पाकिस्तान( Pakistan )समोर भारताने 420 धावांचे लक्ष ठेवले होते. शाहिद आफ्रिदी आणि सईद अनवर यांनी 101 धावांची भागीदारी केली होती. मात्र पाकिस्तानची संपूर्ण टीम फक्त 207 धावा काढू शकली. भारताने ही टेस्ट मॅच 212 धावांनी आपल्या नावावर केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.