भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर पाकिस्तानच्या बाजूनं उतरला मैदानात

जाफरनेही (Wasim Jaffer) ट्वीट करुन आपला मुद्दा मांडला परंतु त्यानंतर इतका गदारोळ झाला की, त्याला त्याच्या जुन्या सामन्याचा स्कोअरबोर्ड शेअर करावा लागला.
Wasim Jaffer
Wasim JafferDainik Gomantak

गेल्या आठवडा पाकिस्तान क्रिकेटसाठी (Pakistan Cricket) बराच वांदग निर्माण करणारा ठरला. न्यूझीलंड संघाने (New Zealand team) पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर इंग्लंडनेही (England) त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला. इंग्लिश संघाच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांनी आणि सोशल मीडियावरील युजर्संनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डावर जोरदार हल्ला केला. यापैकीच एक नाव म्हणजे माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफरचेही आहे. जाफरनेही (Wasim Jaffer) ट्वीट करुन आपला मुद्दा मांडला परंतु त्यानंतर इतका गदारोळ झाला की, त्याला त्याच्या जुन्या सामन्याचा स्कोअरबोर्ड शेअर करावा लागला.

जाफरने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पीसीबीला (PCB) इंग्रजी बोर्डाकडून निराश होण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी ECB ची आठवण करत देत म्हटले की, वॅक्सीन येण्यापूर्वीच पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने इंग्लंडचा दौरा केला होता. वसीम जाफरला एवढे बोलल्यानंतर ट्विटरवरील लोकांनी त्याला लक्ष्य केले.

Wasim Jaffer
Aus Vs Ind: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात हरमनप्रीत कौर मुकणार

जाफर पाकिस्तानी बोर्डाच्या समर्थनार्थात उतरला

जाफरने लिहिले- 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे इंग्लिश क्रिकेट बोर्डावर रागावण्याचे प्रत्येक वैध कारण आहे. कोरोना वॅक्सीन आली नसताना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या टीमने कोविड काळात इंग्लंडला भेट दिली. इंग्लंडला पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे खूप देणे आहे. इतके की किमान ECB हा दौरा रद्द करु शकला नसता.

वापरकर्त्यांच्या टिप्पण्यांमुळे जाफर निराश झाला

जेथे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जाफरच्या मताचे समर्थन केले. तर एका वापरकर्त्याने म्हटले की, जाफरवर पाकिस्तान क्रिकेटच्या समर्थनार्थ उभे राहणे जाफरसाठी कठीण केले. तर दुसऱ्या वापरकर्त्यांने त्याला 26-11 ची आठवण करुन दिली, मग कोणी म्हणाले की, आधी तुम्ही पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये खेळल्यानंतरही या. अशा वक्तव्यानंतर जाफर निराश झाला. यानंतर, माजी भारतीय सलामीवीराने 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याचा स्कोअरबोर्ड शेअर केला.

Wasim Jaffer
IND VS AUS: सराव सामन्यातच मितालीसह स्मृती मंधनाची निराशाजनक कामगिरी

जाफरने स्कोअर बोर्ड शेअर केला

या सामन्यात जाफरने शानदार द्विशतक झळकावले. दानिश कनेरियापासून शोएब अख्तरपर्यंत जाफरने त्या दिवशी पाकिस्तानच्या प्रत्येक गोलंदाजाची जोरदार धुलाई केली होती. त्याने 274 चेंडूत 202 धावा केल्या. त्याने आपल्या डावादरम्यान 34 चौकार लगावले. हा जाफरच्या सर्वोत्तम कसोटी डावांपैकी एक होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com