आयपीएलचा मत्सर करणारेच त्याचे टीकाकार:  सुनील गावसकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

टीका करणारे कायम आम्हाला भारतीय क्रिकेटच्या भवितव्याची चिंता आहे असे सांगतात. आता तेच निर्णय देतात. आता हे आम्हाला सांगणारे ते कोण, अशी विचारणा सुनील गावसकर यांनी केली.

नवी दिल्ली: आयपीएलचा मत्सर करणारेच त्यावर टीका करतात. आयपीएलचा फायदा ज्यांना होत नाही, तेच या लीगला लक्ष्य करतात, असा दावा सुनील गावसकर यांनी केला. 

आयपीएलवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. लीगवरील टीकाकारांना  यातील फक्त पैसा दिसतो. आयपीएलमुळे किती जणांचा फायदा होतो, याकडे ते बघत नाहीत. ही टीका मत्सर भावनेतून येते. लीगचा ज्यांना फायदा होत नाही, तेच यावर टीका करतात, असे गावसकर म्हणाले. टीका करणारे कायम आम्हाला भारतीय क्रिकेटच्या भवितव्याची चिंता आहे असे सांगतात. आता तेच निर्णय देतात. आता हे आम्हाला सांगणारे ते कोण, अशी विचारणा गावसकर यांनी केली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या