FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपचा 20 नोव्हेंबरपासून थरार; जाणून घ्या स्पर्धेविषयी सर्व काही...

किती ग्रुप, किती संघ, कुठे पाहता येईल लाईव्ह प्रक्षेपण? वाचा एका क्लिकवर
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022Dainik Gomantak

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबर सुरू होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा आखाती देशामध्ये होत आहे. कतार या देशात होत असलेल्या या स्पर्धेविषयी आधीच चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. स्पर्धेत किती ग्रुप्स असतील, किती संघांचा सहभाग असणार आणि सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठल्या टीव्ही चॅनेलवर पाहता येतील याविषयी जाणून घेऊया.

FIFA World Cup 2022
Arjuna Award For Bhakti Kulkarni: गोव्याच्या बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

8 ग्रुप, 32 संघ

तर 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत 32 संघांचा सहभाग असणार आहे. 8 ग्रुप्समध्ये हे संघ विभागले गेले आहेत. एका ग्रुपमध्ये चार संघ असतील.

असे आहेत ग्रुप

ग्रुप A - कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेरदलँड

ग्रुप B - इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स

ग्रुप C - अर्जेंटीना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड

ग्रुप D - फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, ट्युनिशिया

ग्रुप E - स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान

ग्रुप F - बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया

ग्रुप G - ब्राझिल, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून

ग्रुप H - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक

असे होतील सामने

स्पर्धेतील ग्रुप लेव्हलचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत खेळले जातील. त्यानंतर राऊंड ऑफ सिक्सटीनचे सामने 3 ते 6 डिसेंबर या काळात होतील. क्वार्टर फायनल सामने 9 आणि 10 डिसेंबर रोजी खेळले जातील. त्यानंतर 13 आणि 14 डिसेंबर रोजी टॉप 4 संघात सेमी फायनलच्या मॅचेस होतील. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना 17 डिसेंबरला होईल, तर अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.

FIFA World Cup 2022
National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

या स्टेडियमवर खेळले जातील सामने....

एकुण 32 संघात 64 सामने 8 वेगवेगळ्या फुटबॉल स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. अल बायत, खलीफा इंटरनेशनल, अल थुमामा, अहमद बिन अली, लुसेल, स्टेडियम 974, एजुकेशन सिटी आणि अल जानौब स्टेडियम या स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.

भारतात लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

फिफा वर्ल्डकपचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येतील. तसेच जियो सिनेमावर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही होणार आहे. भारतात हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30, सायंकाळी 6.30, रात्री 8.30, रात्री 9.30, आणि रात्री 12.30 वाजता असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com