IPL 2022: '...चांगली कामगिरी करतोय', तिलक वर्माने यशाच्या रहस्याचा केला खुलासा

इंडियन प्रीमियर लीगने (IPL 2022) भारताला अनेक स्टार्स दिले आहेत.
IPL 2022: '...चांगली कामगिरी करतोय', तिलक वर्माने यशाच्या रहस्याचा केला खुलासा
Tilak VermaDainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीगने भारताला अनेक स्टार्स दिले आहेत. या लीगच्या प्रत्येक हंगामात नवीन युवा खेळाडू येतात, आणि ते त्यांच्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित करतात. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही या लीगने अनेक स्टार्स दिले आहेत. आयपीएल 2022 मध्येही अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा सिध्द केली आहे. त्यापैकीच एक युवा स्टार खेळाडू म्हणजे तिलक वर्मा (Tilak Verma). तिलक हा पाच वेळा विजेत्या असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा भाग आहे. मुंबईसाठी यंदाचा हंगाम सुमारचं गेला, परंतु तिलकने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने यावेळी म्हटलयं की, आपल्या कामगिरीमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Tilak Verma said that Rohit Sharma and coach Mahela Jayawardene played an important role in his performance)

Tilak Verma
IPL 2022: ''...आता आयपीएलमध्ये केकेआरचा बनला हिरो''

दरम्यान, जर आपण तिलकचा चालू हंगाम पाहिला तर त्याने या हंगामात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने नऊ सामने खेळले आहेत. या नऊ सामन्यांमध्ये त्याने 224 धावा केल्या आहेत. या मोसमात आतापर्यंत त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी 43.86 आहे. रोहितने तुला मुंबईची (Mumbai) कॅप दिल्यावर कसे वाटते, असे विचारले असता तो म्हणाला, 'रोहित खूप आत्मविश्वास देतो.'

रोहितसोबत खेळणार

मुंबई इंडियन्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने सांगितले की, तो रोहितचा लाडका टीममेट आहे. त्याचे स्वप्न भारतीय कर्णधारासोबत खेळण्याचे होते. तिलक म्हणाला, “माझं एक स्वप्न होतं, मला रोहित भाई खूप आवडतात. मला त्यांच्याकडून कॅप मिळाली, जी मिळाल्याने मला खूप आनंद झाला. यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. ते मला कोणत्याही परिस्थितीत दबाव घेऊ खेळू नको असे सांगतात. तुम्ही तरुण आहात त्यामुळे खेळाचा आनंद घ्या कारण एकदा ही वेळ निघून गेली की ती परत येणार नाही. त्यामुळे खेळाचा आनंद घ्या, असे केल्यास सकारात्मक गोष्टी येतील. तुम्ही दु:खी राहिल्यास, दडपणाखाली राहिल्यास तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. त्यामुळे आनंद घ्या, चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील."

Tilak Verma
IPL 2022 : हार्दिक पंड्याने सांगितले गुजरात टायटन्सच्या शानदार कामगिरीचे 'गुप्त'

तो पुढे म्हणाला, “रोहित भाई मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात, मग ती फलंदाजी, गोलंदाजी अगदी क्षेत्ररक्षणातही. मुंबई इंडियन्सची सध्या चांगली कामगिरी होत नाही. आम्ही चांगली कामगिरी करत आहोत, पण आम्ही जिंकू शकत नाही. तरीही रोहीत भाई म्हणतात की, तुम्ही संघासाठी खेळत आहात, हे सर्व होत राहतं, त्यामुळे खेळाचा आनंद घ्या आणि चांगली कामगिरी करत राहा. हे ऐकून मला खूप आनंद वाटला. मला त्याचा फायदाही होत आहे, मी जी काही कामगिरी करत आहे, ती त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळेच."

महेला जयवर्धनेनेही उत्साह वाढवला

तिलक पुढे म्हणाले की, ''संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने देखील माझ्या फलंदाजीबद्दल बरंच काही बोलतात, ज्यामुळे मला त्याचा फायदा होतो. जसे की मी शॉट्स कसा खेळावा. ते म्हणतात की, तुमचे शॉट्स थांबवू नका, कारण हा तुमचा स्कोअरिंग शॉट आहे, आणि स्कोअरिंग शॉट्सवर आउट पण होतो आणि धावाही बनतात.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.