आजची तारीख रेकॉर्ड बुक मास्टर ब्लास्टरसाठी खास; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

सचिन रेकॉर्ड करण्यासाठीच ओळखला जातो, त्यामुळे त्याला रेकॉर्ड बुक म्हणणे वावगे ठरणार नाही.

मुंबई: भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरसाठी 16 तारीख खास आहे.सचिन रेकॉर्ड करण्यासाठीच ओळखला जातो, त्यामुळे त्याला रेकॉर्ड बुक म्हणणे वावगे ठरणार नाही. आजच्याच दिवशी 2012 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपल्या अंतरराष्ट्रीय शतकांचे शतक साजरे केले होते. बांग्लदेशातील मीरपूरमध्ये शेर-ए- बांगला स्टेडियमवर बांग्लादेशाविरुध्द रंगलेल्या सामन्यामध्ये 114 धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून अंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची आजही ख्याती आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्द सचिनने 12 मार्च 2011 विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने 99 वे शतक केले होते. मात्र त्यानंतर सचिन तब्बल दीड वर्षे 99 धावांवरच अडकून पडला होता. याच दरम्यान भारताने वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्या विरोधात कसोटी मालिका खेळली होती. शिवाय़ टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या तिरंगी मालिकेचा हिस्साही होती. मात्र त्यावेळी सचिनला शतक ठोकता आले नव्हते. या दरम्यान सचिनने 34 डाव खेळले होते. शेवटी बांग्लादेशाच्या मुशरफी मुर्ताझाच्या चेंडूवर फटका मारत सचिनच्य़ा मोठ्या विक्रमाची प्रतिक्षा संपली होती.

तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन विराटसमोर धर्मसंकंट

या खेळीमध्ये सचिनने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याचा शतकापर्यंतचा प्रवास दरम्यान मंदावला होता. आणि अखेर सचिनने 138 व्या चेंडूवर शतक पूर्ण केले. सचिनने नवा विक्रम रचला मात्र या सामन्यामध्य़े भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने 50 षटकांमध्ये 289 धावा केल्या होत्या. परंतु बांग्लादेशाने 4 चेंडू बाकी ठेवून हा सामना जिंकला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने 34,347 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यामध्ये 18,426 धावा कसोटीमध्ये 51 शतके आणि वनडे मध्ये 49 शतके ठोकली आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 11 आणि कसोटी सामन्यामध्ये 8 शतके ठोकली आहेत.
 

संबंधित बातम्या