IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच होऊ शकत पदार्पण

IPL 2021 SRH vs RCB: आज हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर सामना; 'या' खेळाडूच होऊ शकत पदार्पण
`SRH vs RCB match

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 च्या हंगामाला 9 एप्रिल पासून सुररूवात झाली. 5 सामने अतिशय अटीतटीचे झाले. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगला आणि मुंबईने या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवने अर्धशतकी पारी खेळली. आज आयपीएलच्या हंगामातील 6 वा सामना सनराइजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नईतील एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. (Today's match against Hyderabad could be the debut of this player)

काय असतील बदल
कोरोनाची चाचणी पॉसिटीव्ह आल्यांमुळे आरसीबीचा सलामी फलंदाज देवदत्त पडीक्कलला पहिल्या सामान्यापासून दूर रहावं लागलं होत. आजच्या सामन्यामध्ये देवदत्त खेळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. देवदत्त पडीक्कल जर खेळाला तर रजत पाटीदारला बाहेर बसावं लागेल. बाकी सर्व संघ तोच राहिल कारण पहिला सामना आरसीबीने जिंकला होता त्यामुळे ते जास्त बदल करणार नाहीत. दुसरीकडे सनराइजर्स हैद्राबादचा उत्कृष्ट फलंदाज केन विल्यम्सन पहिल्या सामन्यामध्ये खेळताना दिसला नव्हता. त्याच संघात पुनरागमन होत का? याकडे लक्ष असणार आहे.

कोणाचे पारडे असणार जड
आरसीबीने  पाहिला सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सला हरवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच हैद्राबाद चा संघ पहिला सामना हारलेला आहे. दोन्हीही संघ तितक्याच ताकतीचे असून दोन्ही संघाकडे स्टार खेळाडूंचा भरणा आहे. परंतू पहिल्या विजयामुळे आरसीबीचे पारडे जड वाटत आहे. आरसीबीकडे विराट कोहली, ए.बी. डिव्हिलिअर्स, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा आहेत तर हैद्राबाद कडे डेविड वाॅर्नर, जॉनी बेयस्टो, मनीष पांडे आहेत. गोलंदाजी मध्ये हैद्राबादचे पारडे जड आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संभाव्य संघ
विराट कोहली (कप्तान), ए.बी. डिव्हिलिअर्स, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, रजत पाटीदार/देवदत्त पडीक्कल, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिश्चन, मोहंमद सिराज, शहाबाज नदीम, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल
सनराइजर्स हैद्राबाद संभाव्य संघ 
डेव्हिड वॉर्नर, व्रिद्धीमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो/केन विल्यमसन, अब्दुल समद, मोहम्मद नबी /जेसन होल्डर, विजय शंकर, राशिद खान, बुहव्हेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com