IPL 2021 MI vs DC: स्पायडर-मॅन विरुद्ध हिटमॅन कोण ठरेल भारी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13  वा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स (एमआय) आणि दिल्ली कॅपिटल (डीसी) यांच्यात चेन्नईच्या चेपॉक  स्टेडियमवर रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13  वा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स (एमआय) आणि दिल्ली कॅपिटल (डीसी) यांच्यात चेन्नईच्या चेपॉक  स्टेडियमवर रंगणार आहे. मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये 4 सामने खेळले गेले. प्रत्येक वेळी मुंबईने दिल्लीला पराभूत केले होते. मागच्या हंगामातील फायनलही दोघांच्या दरम्यान झाली होती, त्यात मुंबईने 5 गडी राखून विजय मिळविला होता. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने प्रथमच अंतिम सामना खेळला होता. आजच्या सामन्यात दिल्ली मुंबईकडून झालेल्या पराभवाचा बदला घेईल का? (Today's match against Spider-Mam vs Hitman Who will be heavy)

कॅप्टन कूल धोनी चिडला; पहा video

या मोसमात दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीचा (डीसीचा) कर्णधार रिषभ पंत आणि मुंबईचा (एमआयचा) कर्णधार रोहित शर्मा दोघेही आपली प्लेयिंग-११ बदलणार नाहीत. पंत आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपद सांभाळत आहे, तर रोहितने सर्वाधिक वेळा आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील भक्कम संघ मानला जातो. 

पॉईंट टेबलमधील स्थान 
मुंबई आणि दिल्लीने आतापर्यंत 2-2  सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले असून 1-1 सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पॉइंट टेबलमध्ये नेट रन-रेट चांगले असल्यामुळे दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा संघ आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो अव्वल क्रमांकावर जाईल. 

दिल्लीची सलामी जोडी फॉर्ममध्ये
सध्याच्या मोसमात फलंदाजीत दिल्लीचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनकडे ऑरेंज कॅप असून त्याने आतापर्यंत 186 धावा केल्या आहेत. त्याचा साथीदार पृथ्वी शॉ देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर मुंबईच्या संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक अजूनही धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने 100 धावांचा टप्पा  गाठलेला नाही. 

महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत भारतीय युवा क्रिकेटर

मुंबई संभाव्य संघ 
रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक(विकेकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, किरोन पोलार्ड, अ‍ॅडम मिलणे, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बाउल्ट.
दिल्ली संभाव्य संघ 
शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत (कप्तान/विकेकीपर), मार्कस स्टोईनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, लुकमान मेरीवाला, कागिसो रबाडा, अवेश खान.

संबंधित बातम्या