टोकियो ऑलिंपिक पात्र क्रीडापटूंना नो क्वारंटाईन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र क्रीडापटूंवर चौदा दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती नसेल, असे ऑलिंपिक संयोजकांनी सांगितले. सध्या जपानमध्ये येणाऱ्यांना चौदा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे.

टोकियो :  टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र क्रीडापटूंवर चौदा दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती नसेल, असे ऑलिंपिक संयोजकांनी सांगितले. सध्या जपानमध्ये येणाऱ्यांना चौदा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे. अद्याप खेळाडूंसाठी नियमावली निश्‍चित केलेली नाही, पण जपानमध्ये येण्यापूर्वी ७२ तास कोरोना चाचणी बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले. या स्पर्धेसाठी येणाऱ्या चाहत्यांसाठीही चौदा दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती करता येणार नसल्याचेही संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुता यांनी सांगितले. त्यांनी स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची त्यांच्या देशात, तसेच जपानमध्ये चाचणी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या