Tokyo Olympics: खेळाडूंना मिळणार 1,60,000 लाख मोफत ‘कंडोम’

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 जून 2021

ऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या समीतीने स्पर्धा असलेल्या ठिकाणी खेळाडूंना मोफत देण्यात येणाऱ्या कंडोमच्या वापराला मानाई केली आहे.

जगभरात कोरोना संसर्ग (covid19) वाढत असताना यंदा टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकची स्पर्धांची तयारी जोरदार सुरु आहे. कोरोना काळात ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) यशस्वीरित्या आयोजित करणे, हे आयाोजकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ऑलिम्पिक पंरपरेनुसार स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना मोफत कंडोम(Condom) देण्यात येणार आहे. तब्बल 1,60,000 कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु कंडोमच्या वापराबाबत एक मोठी समस्या समोर आली आहे.

ऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या समीतीने स्पर्धा असलेल्या ठिकाणी खेळाडूंना मोफत देण्यात येणाऱ्या कंडोमच्या वापराला मानाई केली आहे. ऑलिम्पिक सामन्यांची आठवण म्हणून हे कंडोम खेळाडूंनी आपल्या मायदेशात घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आहे. मायदेशात गेल्यावर खेळाडूंनी याचा वापर करावा, अशी ऑलिम्पिक आयोजक समितीची भूमिका आहे.

ग्लॅन मार्टिन्सचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण

कंडोम आणि ऑलिम्पिकची पंरपरा
1998 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची परंपरा सुरु केली. लैंगिक आणि एचआयव्ही एड्स आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरु करण्यात आली होती. मागच्या वर्षी ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. याआगोदर रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने 4,50,000 कंडोमचे वाटप केले होते.

प्रत्येक खेळाडूंना 14 कंडोम मिळणार 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास 11,000 खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम मिळणार आहेत. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी संपर्क ठेवावा, अशा सूचना देखील ऑलिम्पिक आयोजकांकडून करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक समितीने आपल्या कार्यक्रमाची घोषणा करताना 33 पानांचे एक पुस्तकदेखील प्रसिध्द केले आहे. यामध्ये शारिरीक संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या