Tokyo Olympic: गोव्यातील ॲथलिट्स, तायक्वांडोपटूंचा गौरव

Tokyo Olympic: जागृती उपक्रमांतर्गत पदाधिकाऱ्यांचाही सत्कार
Tokyo Olympic: गोव्यातील ॲथलिट्स, तायक्वांडोपटूंचा गौरव
Tokyo Olympic: North Goa Felicitation of Athletics feliciteesDainik Gomantak

पणजीः टोकियो ऑलिंपिकनिमित्त (Tokyo Olympic) गोव्यातील जागृती उपक्रमांतर्गत रविवारी ॲथलिट्स, गोवा ॲथलेटिक्स संघटनेचे (Goa Athletics Association) पदाधिकारी, तायक्वांडोपटू, राज्य तायक्वांडो (Taekwondo) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. पणजी येथे गोवा ॲथलेटिक्स संघटनेचे श्रीपाद कुंडईकर, सोनाली शेट्येकर, डेझिरी परेरा, टेडी कार्दोझ, आदित्य वळवईकर यांचा वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी, तसेच संघटनेचे सचिव परेश कामत व खजिनदार गुरू सावंत यांचा ॲथलेटिक्ससाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गोवा ऑलिंपिक संघटनेचे उत्तर विभागीय समन्वयक चेतन कवळेकर, संदीप हेबळे, जयेश नाईक, राजेंद्र गुदिन्हो, सनथ भरणे यांची उपस्थिती होती.

Tokyo Olympic: North Goa Felicitation of Athletics felicitees
Tokyo Olympic: गोव्यातील रग्बी खेळाडूंचा गौरव

मडगाव येथील कार्यक्रमात तायक्वांडो खेळात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले रश्मी नाईक, रेश्मा करमळी, इनोश्का रॉड्रिग्ज, प्रणिता तारी, किंबर्ली फर्नांडिस यांचा गोवा क्रीडा प्राधिकरमाचे सहाय्यक सचिव महेश रिवणकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Tokyo Olympic: North Goa Felicitation of Athletics felicitees
Tokyo Olympic: पणजीत स्पर्धेनिमित्त जागृती

Related Stories

No stories found.