Olympic 2020: आता विजेत्या स्टारसाठी लाईफ टाइम फ्री मुव्ही शोची ऑफर

भारतीय मुलींनी बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympic) जोरदार कामगिरी केली.
Olympic 2020: आता विजेत्या स्टारसाठी लाईफ टाइम फ्री मुव्ही शोची ऑफर
Olympic 2020: Free Movei ShowDainik Gomantak

ऑलिम्पिक (Olympics) मध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात वेगवेगळ्या ऑफर देण सुरू आहे. आजीवन डोमिनोजच्या पिझ्झा (Domino's Pizza) डिलीवरी नंतर आता ऑलिम्पिक पदक विजेत्यांना आयनॉक्स (INOX) लेझरकडून आजीवन मोफत चित्रपटाची तिकिटे दिली जाणार आहे. (Tokyo Olympics: Winners to get movie tickets free for lifetime)

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व पदक विजेत्यांसाठी आजीवन मोफत चित्रपटाची तिकिटे दिली जातील, असे सांगितले जात आहे. ऑलिम्पिक कॅथलिट्सचे मनोबल वाढविण्यासाठी हे उपक्रम राबविले जात असल्यामुळे आयएनओएक्स लीजरने त्यांच्या ट्विटर हँडलवर या ऑफरची घोषणा केली. “आयओएनएक्सला टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंबद्दल अभिमान वाटतो,” असे कॅप्शन देत आयओएनएक्सकडून या ऑफरची घोषणा करण्यात आली.

Olympic 2020: Free Movei Show
Tokyo Olympics: सिंधुची विजयी घौडदौड कायम, हॉकीत मात्र महिलांचा पराभव
Olympic 2020: Free Movei Show
Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे कमबॅक, जपानवर आता वादळाचे संकट

पिझ्झा फ्रँचायझी डोमिनोजने मेडल जिंकणार्‍या वेटलिफ्टर मीराबाई चानूला आजीवन फ्री पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या आफरचे कौतुक केले.

खरं तर, पदक जिंकल्यानंतर मीराबाई म्हणाल्या की त्यांना पिझ्झा खायची इच्छा आहे. यापूर्वी शनिवारी पदक जिंकल्यानंतर डोमिनोजने मीराबाईच्या घरी पिझ्झा पाठवला होता. मीराबाईंनी शनिवारी पदक जिंकल्यानंतर मुलाखतीत सांगितले होते की त्या आधी पिझ्झा खाईल.

दरम्यान, भारतीय मुलींनी बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचबरोबर बॅडमिंटनमधील पीव्ही सिंधू आणि तिरंदाजीत दीपिका कुमारी यांनी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. मात्र महिला हॉकी संघाला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com