ट्रेड ग्रुपचा आयपीएलच्या ड्रीम इलेव्हन प्रायोजकत्वाला विरोध

ट्रेड ग्रुपचा आयपीएलच्या ड्रीम इलेव्हन प्रायोजकत्वाला विरोध
Trade group unhappy with dream 11 sponsorship; writes to BCCI

नवी दिल्ली: चिनी गुंतवणूक असलेल्या कंपनीला आयपीएलचे मुख्य प्रायोजक केल्याबद्दल ट्रेड ग्रुप (सीएआयटी) यांनी आक्षेप घेतला आहे आणि बीसीसीआयला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे, की ड्रीम इलेव्हन कंपनीत टेन्सेंट ग्लोबल या चिनी कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे त्यांना आयपीएलचे मुख्य प्रायोजक केल्याबद्दल आमचा तीव्र आक्षेप आहे. 

ड्रीम इलेव्हन या कंपनीला आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व देताना भारतीयांच्या भावनांचा विचार तुम्ही केलेला नाही. चीनविषयी प्रत्येक भारतीयांच्या मनात राग आहे, असे सीएआयटीने म्हटले आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सीएआयटी देशभर चालवत आहे.

चीनची कंपनी असलेल्या विवोने आयपीएलबरोबरचा मुख्य प्रायोजकत्वाचा करार एका वर्षासाठी रद्द केला. त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या लिलावात ड्रीम इलेव्हनने २२२ कोटींची बोली लावली. इतरांच्या तुलनेत ही अधिक रक्कम असल्यामुळे बीसीसीआयने ती मान्य केली. विवोबरोबरच्या करारानुसार प्रत्येक वर्षी बीसीसीआयला ४४० कोटी मिळत होते. आता विवोने पुढील दोन वर्षांसाठी असलेला करार पूर्ण करण्यास नकार दिला; तर ड्रीम इलेव्हन सलग तीन वर्षे आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील.

संपादन: ओंकार जोशी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com