महिला चॅलेंजर्स स्पर्धेत व्हेलोसिटी संघाची उडाली दाणादाण
महिला चॅलेंजर्स स्पर्धेत बुधवारी अखेरच्या चेंडूवर विजयाचे समाधान मिळालेल्या मिताली राजच्या व्हेलोसिटी संघाची आज दाणादाण उडाली. अवघ्या ४७ धावांत त्यांना गारद करून ट्रेलब्लेझर संघाने दणदणीत विजय मिळवला.
शारजा : महिला चॅलेंजर्स स्पर्धेत बुधवारी अखेरच्या चेंडूवर विजयाचे समाधान मिळालेल्या मिताली राजच्या व्हेलोसिटी संघाची आज दाणादाण उडाली. अवघ्या ४७ धावांत त्यांना गारद करून ट्रेलब्लेझर संघाने दणदणीत विजय मिळवला.
महिला चॅलेंजर्स स्पर्धेतला हा दुसरा सामना एकदमच एकतर्फी झाली. सामना ट्वेन्टी-२० चा (दोन्ही मिळून ४० षटके) असला तरी संपूर्ण सामना २३ षटकेच चालला. व्हेलोसिटी संघाला १५.१ षटकांत ४७ धावांत गुंडाळल्यावर ट्रेलब्लेझर संघाने हे आव्हान कर्णधार मानधनाची विकेट गमावून ७.५ षटकांतच पार केले.
व्हेलोसिटी संघात तडाखेबाज शेफाली वर्मा, डॅनियल वॅट, मिताली राज, वेदाकृष्णमूर्ती अशा सरस फलंदाज आहेत तसेच कालच्या सामन्यात सुशमा वर्मा आणि सून लुस यांनी निर्णायक फलंदाजी केली होती, परंतु या सर्व फलंदाजांनी आज ट्रायलब्लेझर संघाच्या गोलंदाजांसमोर शरणागती स्वीकारली. जुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन; तर सोफिया एक्लेस्टोनने चार विकेट मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक ः व्हेलोसिटी ः १५.१ षटकांत सर्व बाद ४७ (शेफाली वर्मा १३, डॅनिलय वॅट ३, मिताली राज १, वेदा कृष्णमूर्ती ०, शिखा पांडे १०, लेघ कास्प्रेक ११, जुलन गोस्वामी १३-२, एक्लेस्टोन ९-४, राजेश्वरी गायकवाड १३-२) पराभूत वि. ट्रेलब्लेझर ः ७.५ षटकांत १ बाद ४९ (डेनेंद्रा डॉटिन नबाद २९ -२८ चेंडू, ३ चौकार, स्मृती मानधाना ६, रिचा घोष नाबाद १३)