व्यक्तिमत्त्व विकासातही प्रशिक्षण फायदेशीर : ग्लेन मार्टिन्स

किशोर पेटकर
शनिवार, 25 जुलै 2020

ई-मेंटॉरशिप सत्रात सेझा अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव ज्योवितो लोपिस यांनीही मार्गदर्शन केले.

पणजी

सेझा फुटबॉल अकादमीच्या प्रशिक्षणार्थींशी राज्यातील व्यावसायिक फुटबॉलपटू ग्लेन मार्टिन्स याने आभासी व्यासपीठाद्वारे संवाद साधला. तो स्वतः या अकादमीचा माजी प्रशिक्षणार्थी आहे. अकादमीतील प्रशिक्षण व्यक्तिमत्त्व विकासातही फायदेशीर ठरल्याचे त्याने नमूद केले.

ई-मेंटॉरशिप सत्रात सेझा अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव ज्योवितो लोपिस यांनीही मार्गदर्शन केले. कोविड-१९ महामारीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत युवा खेळाडूंचे उन्नतीकरण करणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता. या सत्राचे आयोजन करणाऱ्या चमूचे सेझा फुटबॉल अकादमीचे अध्यक्ष अनन्य अगरवाल यांनी कौतुक केले. 

सेझा फुटबॉल अकादमीतील प्रशिक्षणाचा आपल्याला केवळ फुटबॉल कौशल्य विकसित करण्यासाठीच नव्हेतर व्यक्तिमत्त्व विकासातही खूप फायदेशीर ठरलेअशी कबुली ग्लेन याने सत्रात दिली. दीर्घकालीन विचार करून असामान्य प्रयत्नांद्वारे आणि प्रशिक्षण कालावधीचा कमाल मर्यादेपर्यंत वापर केल्यास नक्कीच लाभ होईलअसा सल्ला त्याने दिला.

फुटबॉल केवळ पायांनीच नव्हेतर ह्रदय आणि मनाने खेळणे आवश्यक आहे. यश हे अपघात नसून मेहनतचिकाटीत्यागदृढनिश्चयअधिकारिणीचा आदरतसेच तुम्ही जे करता किंवा शिकता त्याप्रती प्रेम आणि आवड यांचे फळ असल्याचे लोपिस यांनी नमूद केले.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या