सायकलप्रेमींसाठी खुशखबर, गोव्यातील चार शहरात होणार सायकल राईड..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

पणजी : ट्रायगोवा फौंडेशनतर्फे येत्या आठ नोव्हेंबरला राज्यातील चार शहरांत १०० किलोमीटरची सायकल राईड आखण्यात आली आहे. पणजी, मडगाव, फोंडा आणि वास्को शहरात सायकलपटू सहभागी होतील.

पणजी : ट्रायगोवा फौंडेशनतर्फे येत्या आठ नोव्हेंबरला राज्यातील चार शहरांत १०० किलोमीटरची सायकल राईड आखण्यात आली आहे. पणजी, मडगाव, फोंडा आणि वास्को शहरात सायकलपटू सहभागी होतील.

सायकल राईडला सकाळी साडेसहा वाजता सुरवात होईल. सहभागी सायकलपटूस साडेसात तासात शंभर किलोमीटर अंतर कापावे लागेल. विशेष बाब म्हणजे, चारही शहरात एका वेळेस राईड सुरू होईल. किमान १५ वर्षे वयोमर्यादेच्या सायकलपटूस या राईडमध्ये सहभागी होता येईल. १८ वर्षांखालील सायकलपटूस पालकांची सोबत भासेल.  सायकल राईडमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नोंदणीसाठी राजेश मल्होत्रा (७७२०८८२२२८) किंवा जगन्नाथ हेदे (९८५०४७२६९७) यांच्याशी अथवा trigoarandonneurs@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या