Duleep Trophy: धोनीचा हुकमी एक्का खेळणार वेस्ट झोनकडून, 'या' खेळाडूची घेणार जागा

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
MS Dhoni | CSK
MS Dhoni | CSKDainik Gomantak

West Zone, Duleep Trophy 2023-24: भारतात सध्या दुलीप ट्रॉफी 2023-24 स्पर्धा सुरू आहे. विभागीय पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत पश्चिम विभागाचा (West Zone) सामना 5 जुलैपासून मध्य विभागाविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरूमधील अलुर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेसाठी पश्चिम विभागात मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला संधी मिळाली आहे. त्याला चेतन साकारियाच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. साकारिया दुखापतग्रस्त झाला असल्याने त्याला या स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे.

MS Dhoni | CSK
Ben Stokes Video: 4, WD, 6, 6, 6 अन् स्टोक्सचा कांगारुंना शतकी दणका! 'हा' रेकॉर्डही केला नावावर

आयपीएल 2023 मध्ये चमकला देशपांडे

देशपांडे आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. या हंगामात त्याने शानदार कामगिरी केली होती. तो आयपीएल 2023 मध्ये विजेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.

धोनीला दिलं श्रेय

देशपांडेने त्याच्या यशाचे श्रेय धोनीला दिले आहे. त्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की 'एकदा मी चांगली गोलंदाजी केली नाही, तेव्हा त्याने मला सांगितले की काळजी करू नकोस. चिंता न करता प्रक्रियेवर लक्ष दे. एकदा प्रेझेंटेशनवेळी त्याने सांगितले होते की नवीन इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे २०० पेक्षा जास्त धावा निघणे सामन्य असेल. तो खेळाडूंमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करतो, ज्याची युवा खेळाडूंना अपेक्षा असते.'

MS Dhoni | CSK
Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

तसेच तुषार म्हणाला, 'धोनीच्या योजना स्पष्ट असते की हे करायचे आहे आणि ती नंतर अमंलात आणायची आहे. तो स्वातंत्र्यही देतो आणि गरज पडल्यास सांगतोही. त्याने मला सांगितले की वरिष्ठ स्तरावर खेळण्यासाठी माझ्याकडे सर्वकाही आहे, फक्त शांत राहा, दीर्घ श्वास घे. मनाला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे.'

देशपांडेची आकडेवारी

देशपांडेने त्याच्या कारकिर्दीत 29 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 80 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 34 लिस्ट ए सामने खेळले असून 35 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 59 टी20 सामने खेळले असून 83 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com