किम रैक्कोनेनचा ‘पृथ्वीला दोन प्रदक्षिणा’ मारून विक्रम

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सलग दुसऱ्या रविवारी किमने विक्रम केला. त्याने सिल्व्हरस्टोन शर्यतीत १६ हजार ८४५ लॅप पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने मायकेल शूमाकरच्या नावावरील हा विक्रम मागे टाकला होता. 

लंडन: किमी रैक्कोनेन याने फॉर्म्युला वन शर्यतीच्या मालिकेत पृथ्वीला दोन प्रदक्षिणा मारता येतील याच्यापेक्षा जास्त अंतर पार करण्याची विक्रमी कामगिरी केली. त्याने या शर्यतीत एकंदर ५० हजार मैलांपेक्षा म्हणजेच ८० हजार ४६७ किमीपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. 

किमी स्पॅनिश शर्यतीत चौदावा आला, पण त्याच्या कामगिरीची दखल रेसिंग जगतास घेणे भाग पडले. जेव्हा त्याने या शर्यतीतील ३७ वी फेरी पूर्ण केली. त्यावेळी त्याने ८३ हजार ८४६ किमी अंतर पार केले होते. हेच अंतर ५२ हजार ९९ मैल होते. पृथ्वीचा परिघ २४ हजार ९६१ मैल आहे, म्हणजेच त्याच्या दुप्पट अंतर त्याने पार केले आहे. 

सलग दुसऱ्या रविवारी किमने विक्रम केला. त्याने सिल्व्हरस्टोन शर्यतीत १६ हजार ८४५ लॅप पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने मायकेल शूमाकरच्या नावावरील हा विक्रम मागे टाकला होता. 

फिनलंडचा असलेला या ४० वर्षीय अल्फा रोमिओ ड्रायव्हरने २००७ मध्ये जागतिक विजेतेपद जिंकले होते. तो स्पॅनिश शर्यतीत चौदावा आला असला तरीही त्याच्या संघातील मोसमातील सर्वोत्तम कामगिरीही होती. सॉफ्ट टायर असते तर कामगिरी अधिक चांगली झाली असती, असे त्याने सांगितले. 

सर्वाधिक अंतर पार करण्याच्या विक्रमाबाबत बोलण्यास किम तयार नव्हता. त्याला याबाबत विचारणा केल्यावर त्याने गत शर्यतीच्या तुलनेत यावेळी जास्त वेगाने शर्यत पूर्ण केली. अर्थात यापेक्षा जास्त वेग आवश्‍यक आहे, असे सांगत त्याने विक्रमाबाबत टिप्पणी करणे टाळले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या