U-17 Football : भारतीय मुलांनी उझबेकिस्तानला नमविले

आशिया करंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी सुरू
U-17 Football Match
U-17 Football MatchDainik gomantak

U-17 Football : भारताच्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय संघाने मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत पाहुण्यात उझबेकिस्तानच्या 17 वर्षांखालील संघावर 2-0 फरकाने शानदार विजय नोंदविला. सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

U-17 Football Match
Goa Pro-League Football : स्पोर्टिंग क्लबचा गार्डियन एंजलवर तीन गोलने सोपा विजय

भारताच्या 17 वर्षांखालील संघाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी उझबेकिस्तानचा संघ दौऱ्यावर आला आहे. भारताचा संघ 17 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला असून त्यादृष्टीने संघाची तयारी सुरू आहे.

बिबियान फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाचे दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (ता. 24) वास्को येथेच प्रकाशझोतात खेळला जाईल.

U-17 Football Match
IND vs NZ Hockey World Cup 2023 : भारताचं स्वप्न भंगलं, क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत

कर्णधार वनलालपेका गुईटे याने 29व्या मिनिटास यजमान संघाचे गोलखाते उघडले. नंतर 45+2व्या मिनिटास लालपेखलुआ याने दुसरा गोल केला. दोन्ही गोल कोरोऊ सिंग याच्या असिस्टवर झाले. त्यालाही गोल करण्याची संधी होती

मात्र 68व्या मिनिटास त्याला चेंडूला गोलनेटची दिशा दाखविता आली नाही. सामन्यात उझबेकिस्तानलाही गोल करण्याच्या संधी होत्या, पण भारतीय गोलरक्षक साहिल याने दक्ष कामगिरी प्रदर्शित केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com