Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak

WPL Auction 2023: वर्ल्डकप विजेती कर्णधार शफाली वर्माला लागली 2 कोटींची बोली, 'या' संघानं केलं खरेदी

19 वर्षीय शफाली वर्माला वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात 2 कोटींची बोली लागली आहे.

WPL Auction 2023: मुंबईत सोमवारी (13 फेब्रुवारी) वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाचा लिलाव झाला. या लिलावात अनेक स्टार भारतीय आणि परदेशी खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागलेली पाहायला मिळाली. यामध्ये भारताची 19 वर्षांखालील विश्वविजेती कर्णधार शफली वर्मालाही मोठी बोली लागली.

या लिलावात सुरुवातीच्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी शांत होती. मात्र दुसऱ्या सत्रात त्यांनी सुरुवातीला जेमिमाह रोड्रिग्जसाठी 2.20 कोटी रुपये मोजले. त्यानंतर त्यांनी शफाली वर्मालाही 2 कोटी रुपयात खरेदी करत आपल्या संघात सामील करून घेतले.

Shafali Verma
WPL 2023: मुंबई इंडियन्स संघात झुलनसह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकटरची एन्ट्री, सांभाळणार 'ही' जबाबदारी

शफालीसाठीही डब्ल्यूपीएल संघांमध्ये चांगलीच चढाओढ झाली होती, पण दिल्लीने तिची बोली जिंकली. 19 वर्षीय शफालीकडे वरच्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. याबरोबरच ती अद्याप 19 वर्षांचीच असल्याने तिच्यातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते.

शफाली या डब्लूपीएलमधील महागड्या खेळाडूंपैकी एक ठरली आहे. या डब्ल्यूपीएल लिलावात 7 खेळाडूंना 2 कोटींहून अधिकची बोली लागली, यात शफलीचाही समावेश आहे. भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला 3.40 कोटी रुपयांची बोली लावली

Shafali Verma
WPL 2023: मिताली पाठोपाठ अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये दिग्गजांची एन्ट्री! ऑसी दिग्गज मुख्य प्रशिक्षक, तर...

शफालीच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वीच 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे ती भारताची पहिलीच आयसीसी विजेतेपद जिंकणारी महिला कर्णधारही ठरली होती. तिने आत्तापर्यंत 52 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 5 अर्धशतकांसह 1264 धावा केल्या आहेत.

दरम्यान पहिल्या डब्ल्यूपीएलचा हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. या हंगामात होणारे एकूण 22 सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम या दोन मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com