टेबल टेनिस लीग रद्द झाल्यातच जमा

.
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

अल्टीमेट टेबल टेनिस लीगचे चौथे पर्व यंदा होण्याची शक्‍यता धूसर आहे. ही लीग १४ ते ३१ ऑगस्टदरम्यान ठरली होती, पण जगातील अनेक क्रीडा स्पर्धा तसेच लीग स्थगित आहेत, त्यात टेबल टेनिस लीगचाही समावेश झाला आहे. 

नवी दिल्ली: अल्टीमेट टेबल टेनिस लीगचे चौथे पर्व यंदा होण्याची शक्‍यता धूसर आहे. ही लीग १४ ते ३१ ऑगस्टदरम्यान ठरली होती, पण जगातील अनेक क्रीडा स्पर्धा तसेच लीग स्थगित आहेत, त्यात टेबल टेनिस लीगचाही समावेश झाला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेच्या पुनरागमनाबाबत अनिश्‍चितता आहे. या स्थितीत लीग नजीकच्या कालावधीत होणार नाही याची जाणीव प्रवर्तक इलेवन स्पोर्टस्‌लाही आहे. टोकियो ऑलिंपिकनंतर ही लीग घेण्याचे ठरले होते. ऑलिंपिकच एक वर्ष लांबणीवर पडले आहे.  लीग घेण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारची मंजुरी आवश्‍यक असते. त्याचबरोबर भारतीय महासंघासह चर्चा करून खेळाडूंची उपलब्धता निश्‍चित करण्यात येते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची मंजुरीही आवश्‍यक असते. हे नजीकच्या कालावधीत घडण्याची शक्‍यता मला तरी दिसत नाही, असे इलेव्हन स्पोर्टस्‌च्‌े संचालक कमलेश मेहता यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या