उमरानचे टिम इंडियात पदार्पण, आयर्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

उमरान हा आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. त्याने या मोसमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडला.
Umran Malik
Umran Malik BCCI

Umran Malik Debut T20I: टीम इंडियाने डब्लिन येथे खेळल्या जाणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उमरान मलिकचा समावेश केला आहे. उमरान आपला टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना खेळणार आहे. तो एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने आयपीएल 2022 मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. जम्मू-काश्मीरच्या उमरानवर विश्वास व्यक्त करत कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघ व्यवस्थापनाने त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे.(Match Ireland vs India Dublin)

Umran Malik
4 शतके, 275 ची सर्वोत्तम धावसंख्या; 2022 च्या रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानची दहशत

उमरान हा आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. त्याने या मोसमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडला. उमराणचा विक्रम बघितला तर तो सरस ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 22 टी-20 सामन्यांमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 5 डावात 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये एक सामनाही खेळला आहे. आता तो पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

Umran Malik
INDvsENG: ECB ने पाचव्या कसोटीच्या वेळेत केला बदल, आता यावेळी सुरू होणार सामना

भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर असून येथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने उमरानसह इतर अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. मात्र पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त उमरानलाच स्थान देण्यात आले आहे. त्याला टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू भुवनेश्वर कुमारने पदार्पणाची कॅप दिली होती. यावेळी संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफही उपस्थित होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com