जागतिक कसोटी अजिंक्‍यपद फायनल 'लॉर्डस्' वर नाही ..?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या असताना आता विजेतेपदाचा सामना होणाऱ्या लॉर्डस मैदानाबाबतही अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. लवकरच तोडगा निघाला नाही तर आयसीसीकडून अंतिम सामन्याचे हे ठिकाण बदलले जाण्याची शक्‍यता आहे.

लंडन :  जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या असताना आता विजेतेपदाचा सामना होणाऱ्या लॉर्डस मैदानाबाबतही अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. लवकरच तोडगा निघाला नाही तर आयसीसीकडून अंतिम सामन्याचे हे ठिकाण बदलले जाण्याची शक्‍यता आहे.

आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट मंडळ यांच्यात आर्थिक करारावरून हा प्रेच निर्माण झाला आहे. आयसीसी आणि इंग्लंड यांच्याच चर्चा सुरू असली तरी चित्र आशादायी नसल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे.

१० ते १४ जून २०२१ या कालावधीत अंतिम सामना लॉर्डस येथे प्रस्तावित आहे, परंतु हा सामना लॉर्डसऐवजी दुसऱ्या ठिकाणी होईल, याबाबत आत्ताच अंदाज वर्तवणे योग्य नाही, असे सूत्रांनी सांगितले. कसोटी अजिंक्‍यपदाचेही वेळापत्रक विस्कटले आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने गुणांऐवजी सरासरीचे नवे सूत्र तयार केले आहे.

संबंधित बातम्या