एफसी गोवाचे गोलमशीन यंदाही धडाडणार?

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

आक्रमक शैलीचे तत्त्वज्ञान जोपासणारा एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत आकर्षक फुटबॉलसाठी ओळखला जातो. स्पर्धेत गोलांचे द्विशतक नोंदविणारा एकमेव संघ आहे. नवे मार्गदर्शक ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळच्या मोसमातही संघाचे गोलमशीन धडाधडण्याची अपेक्षा चाहत्यांना असेल.

पणजी : आक्रमक शैलीचे तत्त्वज्ञान जोपासणारा एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत आकर्षक फुटबॉलसाठी ओळखला जातो. स्पर्धेत गोलांचे द्विशतक नोंदविणारा एकमेव संघ आहे. नवे मार्गदर्शक ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळच्या मोसमातही संघाचे गोलमशीन धडाधडण्याची अपेक्षा चाहत्यांना असेल.

२०१४ ते २०१९-२० या सहा मोसमात एफसी गोवाने धडाकेबाज खेळाने फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. गतमोसमात २० लढतीत ५१ गोल नोंदवून या संघाने स्पर्धेत नवा उच्चांक रचला. आयएसएलमधील सलग तीन मोसम सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम एफसी गोवाने बजावला आहे. साहजिकच नव्या प्रशिक्षकांच्या शैलीत गोल नोंदविण्याची परंपरा कायम राखण्याचे आव्हान संघाला पेलावे लागेल. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको, नंतर लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा गोल झरा आटला नाही. गतमोसमात पाच सामन्यांत प्रभारी प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखालीही संघाची आक्रमक शैली बहरली होती. यंदा मुंबई सिटीचे प्रशिक्षक असलेल्या लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने २०१७-१८ मोसमात ४३, २०१८-१९ मोसमात ४१, तर २०१९-२० मोसमात ३२ गोल केले.

अधिक वाचा : 

मुंबई सिटीच्या अनुभवी खेळाडूंना नॉर्थईस्टचा ‘दे धक्का’

यावर्षीही एफसी गोवावर एफसी बंगळूर भारी पडणार..?

संबंधित बातम्या