पतीच्या समावेशासाठी साईना नेहवालचे ‘बंड’

.
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय शिबिरास जाण्यास नकार

हैदराबाद: पती पारुपली कश्‍यपला राष्ट्रीय शिबिरात स्थान न दिल्याने साईना नेहवालनेही त्यापासून दूर राहण्याचे ठरवले आहे. ऑलिंपिक पात्रतेची कश्‍यपलाही संधी असताना तो शिबिरात का नाही, अशी विचारणा साईनाने केल्याचे समजते. 

गोपीचंद अकादमीत सुरू झालेल्या ऑलिंपिक पूर्वतयारी शिबिरात केवळ चार बॅडमिंटनपटू आहेत. सिंधू, सिक्की रेड्डी, साई प्रणित आणि श्रीकांत हेच शिबिरासाठी दाखल झाले आहेत. 

टोकियो ऑलिंपिकसाठी पुरुष, तसेच महिला एकेरीसाठी प्रत्येक देशाचे दोन खेळाडू पात्र ठरू शकतात. जागतिक क्रमवारीत २५ वा असलेला कश्‍यप राष्ट्रीय क्रमवारीत तिसरा आहे. त्यालाही पात्रतेची संधी आहे, असे साईनाचे मत आहे. गोपीचंद अकादमीत नऊ कोर्ट आहेत. त्यामुळे आठच खेळाडूंवर मर्यादा का, अशी विचारणा केली आहे. आम्ही कोणाची मदत मागत नाही. राष्ट्रीय क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या खेळाडूला संधी मिळायला हवी, असे कश्‍यपने सांगितले.

संबंधित बातम्या