INDvsENG : अश्विनच्या नावावर झाला अनोखा रेकॉर्ड; दिग्गज क्रिकेटपटूंना सोडले मागे 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. आणि त्यानंतर आता इंग्लंडसोबत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात देखील अश्विनने चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. आणि त्यानंतर आता इंग्लंडसोबत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात देखील अश्विनने चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात 5 विकेट घेतल्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आहे. या अष्टपैलू कामगिरीने अश्विनने अनेक क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. रविचंद्रन अश्विन पहिल्या डावात पाच विकेट आणि तीन वेळा शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 

INDvsING: अश्विनच्या शतकानंतर त्याच्या पत्नीचा 'षटकार', ट्विट तुफान...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात अश्विनने दमदार खेळ केला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 329 धावा केल्या. आणि त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला टीम इंडियाने 134 धावांवर रोखले. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या या डावात एकूण 5 बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ अडचणीत सापडल्यानंतर अश्विनने पुन्हा एकदा लक्षवेधी खेळ केला. अश्विनने दुसऱ्या डावात 148 चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि 14 चौकरांसह 106 धावा केल्या. त्यामुळे अश्विनच्या नावावर नवा रेकॉर्ड जमा झाला आहे. 

एकाच कसोटी सामन्यात पाच विकेट्स आणि तीन वेळा शतक झळकावण्याचा विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावावर जमा झाला आहे. याबाबतीत अश्विनने गॅरी सोबर्स, मुश्ताक अहमद, जॅक कॅलिस आणि साकिब अल हसनला मागे टाकले आहे. या सर्वांनी आपल्या कारकिर्दीत एकाच कसोटी सामन्यात पाच विकेट्स आणि शतक झळकवण्याचा विक्रम दोन वेळेला केला आहे. तर इयान बोथमने सर्वाधिक वेळेला हा कारनामा केलेला आहे. त्याने एकाच कसोटी सामन्यात पाच विकेट्स आणि शतक मारण्याचा पराक्रम पाच वेळेला केलेला आहे. 

एकाच कसोटी सामन्यात पाच विकेट्स आणि शतक मारणारे खेळाडू - 

इयान बोथम - पाच वेळेस 

रविचंद्रन अश्विन - तीन वेळेस 

गॅरी सोबर्स - दोन वेळेस 

मुश्ताक अहमद - दोन वेळेस 

जॅक कॅलिस - दोन वेळेस 

साकिब अल हसन - दोन वेळेस 

दरम्यान, इंग्लंड सोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना 23.5 षटकात 43 धावा देऊन 5 बळी घेतले. व त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अश्विनने शतक झळकावले. यावेळेस अश्विनने सातव्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत 96 धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजबरोबर शेवटच्या विकेटसाठी 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी अश्विनने केली. आणि त्याच्या याच खेळीमुळे भारतीय संघ 250 धावांच्या पुढे पोहचू शकला.   

संबंधित बातम्या