टी -20 विश्वचषकासाठी Universal Bossची IPL मधून माघार

आगामी टी -20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज (West Indies) संघासाठी स्वतःला तयार करायचे आहे. आता मला दुबईत जाऊन विश्रांती घ्यायची आहे. त्याने पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचे आभार मानले आणि उर्वरित सामन्यांसाठी संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
टी -20 विश्वचषकासाठी Universal Bossची IPL मधून माघार
किंग्स 11 पंजाबमधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) IPL स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. Dainik Gomantak

किंग्स 11 पंजाबमधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) IPL स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये गेलला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले. ख्रिस गेलने बायो बबलचे (Bio Bubble) कारण सांगून स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, याची माहिती संघाने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

किंग्स 11 पंजाबमधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) IPL स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2021: MSD च्या 'फिनीशींग सिक्सने' CSK इन तर SRH आउट

ख्रिस गेल म्हणाला, मी गेल्या अनेक महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहे. क्रिकेट वेस्ट इंडिज, सीपीएल आणि आयपीएलच्या बायो बबलमध्ये होते. मला स्वत: ला मानसिक रीफ्रेश करायचे आहे. आगामी टी -20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघासाठी स्वतःला तयार करायचे आहे. आता मला दुबईत जाऊन विश्रांती घ्यायची आहे. त्याने पंजाब किंग्ज संघाचे आभार मानले आणि उर्वरित सामन्यांसाठी संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंजाब किंग्जमध्ये समाविष्ट असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल टी -20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आयपीएलचा हा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला राहिला नाही. गेलने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण 10 सामने खेळले, 125.32 च्या स्ट्राईक रेटने त्याने 193 धावा केल्या. गेलने युएईमध्ये सुरू आयपीएलच्या 2 सामन्यांमध्ये फक्त 15 धावा केल्या आहेत.

Related Stories

No stories found.