IPL 2021: युनिव्हर्स बॉसला लागले बॉलिवूडचे वेड; पहा Video

IPL 2021: युनिव्हर्स बॉसला लागले बॉलिवूडचे वेड; पहा Video
Chris Gayle

इंडियन प्रीमियर लीगला युवांचा खेळ मानले जाते. आयपीएलमधील प्रदर्शनावर अनेक खेळाडूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये जागा मिळावली आहे. आयपीएलला युवांचा खेळ मानला जातो यात काहीच वाद नाही पण आजही आयपीलमध्ये अनुभवी खेळाडूंचा सिक्का चालताना दिसतो. यामध्येच एक आहे युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा पंजाब किंग्सचा खेळाडू ख्रिस गेल. (Universe Boss has Bollywood craze; video)

अमरीश पुरींचा गाजलेला डायलॉग म्हणत आहे 
मागच्या सामन्यात के.एल. राहुल सोबत खेलत ख्रिस गेलने पंजाब किंग्सला 9 विकेटने विजय मिळवून दिला होता. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स सारख्या बलाढ्य संघाला हरवल्यानंतर ख्रिस गेलने बॉलिवूडमधील डायलॉग म्हणत खुषी व्यक्त केली. पंजाब किंग्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ख्रिस गेलचा व्हिडीओ शेर केला. व्हिडीओमध्ये गेल अमरीश पुरी यांचा गाजलेला डायलॉग म्हणताना दिसत आहे. गेल अनिल कपूरचा चित्रपट मिस्टर इंडियन मधील गाजलेला डायलॉग 'मोगॅम्बो खुश हुवा' म्हणताना दिसत आहे. ख्रिस गेलचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Punjab Kings (@punjabkingsipl)

ख्रिस गेलला आयपीएलच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बादशहा समजले जाते. गेलने 2020 मध्ये आपल्या टी-20 कारकिर्दीतील 1000 षटकार पूर्ण केले आहेत. तो 1000 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीलच्या इतिहासात पण सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 मध्ये 175 धावांची खेळी करत आयपीलच्या इतिहासातील सर्वात जास्त धावा करणारी खेळी होती. नुकतेच ख्रिस गेलचे नवीन गाणे देखील आले  आहे. त्यात गेल प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई सोबत रॅप करताना दिसत आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com