
Royal Challengers Bangalore Women vs UP Warriorz: यूपी वॉरियर्सने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 10 गडी राखून पराभव केला. यूपीचा हा दुसरा विजय आहे, तर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखालील बंगळुरु संघाचा स्पर्धेतील सलग चौथा पराभव.
यूपी व्यतिरिक्त, बंगळुरु संघ स्पर्धेत उपस्थित असलेल्या इतर तीन संघांकडून (मुंबई इंडियन्स, गुजराज जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स) हरला आहे.
पॅरीच्या अर्धशतकामुळे प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुला 19.3 षटकांत केवळ 138 धावाच करता आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून यूपी संघाची कर्णधार अॅलिसा हिली हिच्या दमदार खेळीमुळे सामना 42 चेंडू शिल्लक असताना एकही विकेट न गमावता जिंकला.
दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) चांगली सुरुवात केली. मानधना आणि डिवाइनमध्ये पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी झाली. मात्र, स्मृती अवघ्या चार धावा करुन बाद झाली.
सोफीने 24 चेंडूत 36 धावा केल्या. अॅलिसा पॅरीने शानदार अर्धशतक झळकावले. 39 चेंडूत 52 धावा करुन ती बाद झाली. पाटीलने 15 आणि बर्न्सने 12 धावांचे योगदान दिले. वॉरियर्सतर्फे सोफी एक्लेस्टोनने चार आणि दीप्ती शर्माने तीन बळी घेतले.
तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाची या स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी झाली आहे. संघाने खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत, तर यूपी वॉरियर्सची कामगिरी थोडी चांगली झाली आहे. या संघाने दोनपैकी एक सामना गमावला आहे आणि एक जिंकला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.