माजी खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर संघ उभारणीसाठी करा: राहुल द्रविड
माजी खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर संघ उभारणीसाठी करा

माजी खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर संघ उभारणीसाठी करा: राहुल द्रविड

मुंबई:  विविध राज्यांनी आपापले संघ उभारणी रचनेत माजी खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला देशाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख या नात्याने दिला. बीसीसीआयने संलग्न राज्य संघटनांसाठी वेबिनार आयोजित केले होते त्यात द्रविड बोलत होते.

या वेबिनारमध्ये विविध राज्य संघटनांचे सचिव किंवा क्रिकेट ऑपरेशन अधिकारी यांच्यासह बीसीसीआय-एनसीएकडून राहुल द्रविड, एज्युकेशन विभागाचे प्रमुख सुजीत सोमसुंदर, ट्रेनर आशिष कौशिक उपस्थित होते. कोरोनानंतर क्रिकेट पुन्हा सुरू करण्यापूर्वी तंदुरुस्तीबाबत डाटा गोळा करावा, असेही या वेबिनारमध्ये सांगण्यात आले.

द्रविड यांनी कोणतीही गोष्ट आमच्यावर अनिवार्य केली नाही, केवळ सल्ला त्यांनी दिला असे एका राज्य संघटनेच्या सचिवांनी सांगितले. ऑनलाईन आणि थेट अशा दोन टप्प्यांत सराव शिबिराचे दोन टप्पे करावे असे सांगण्यात आले.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com