विराट कोहलीबाबतच्या पोस्टवरून उत्तराखंड पोलिसांनी केली सारवासारव  

विराट कोहलीबाबतच्या पोस्टवरून उत्तराखंड पोलिसांनी केली सारवासारव  
Virat

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-ट्वेन्टी सामना अहमदाबाद येथेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात श्रेयस अय्यर व्यतिरिक्त भारतीय फलंदाजांनी पाहुण्या इंग्लंडच्या संघासमोर अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहली स्वतः शून्यावर बाद झाला होता. यावरून सोशल मीडियावर विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी देखील सोशल मीडियावर एक सामाजिक संदेश देताना विराट कोहलीला ट्रोल केले होते. परंतु यावर देखील जोरदार टीका झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी आपली पोस्ट डिलीट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात विराट कोहली आदिल रशीदच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर श्रेयस अय्यर व्यतिरिक्त कोणताच फलंदाज मैदानावर टिकू शकला नव्हता. व पहिल्याच टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे विराट कोहलीसह भारतीय संघावर सोशल मीडियावर चांगलीच टीका करण्यात येत होती. आणि यातच उत्तराखंड पोलिसांनी देखील वाहतुकीसंदर्भातचा एक सामाजिक संदेश देताना विराट कोहलीला ट्रोल केले होते. मात्र यावर उत्तराखंड पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले असून, त्यांनी आपली ही पोस्ट डिलीट केली आहे. व यासह विराट कोहलीबाबतची आपली ही पोस्ट रस्ते सुरक्षा संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आली होती. व ही पोस्ट एक सामान्य संदेश होता आणि याद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे उत्तराखंड पोलिसांनी म्हटले आहे. 

यापूर्वी, पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी सोशल मीडियावरील ट्विटरवरून, हेल्मेट घालणेच पुरे नसल्याचे म्हणत सावधगिरीने वाहन चालवणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर, सावधगिरी न बाळगल्यास आपण देखील शून्यावर बाद होऊ शकता, असे उत्तराखंड पोलिसांनी आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले होते. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघाने 125 धावांचे लक्ष्य पाहुण्या संघासमोर ठेवले होते. आणि इंग्लंडच्या संघाने हे लक्ष्य 27 चेंडू आणि आठ गडी राखतच गाठले. व या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने 1 - 0 ने आघाडी घेतली.   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com