हसरंगासाठी 4 नंबर ठरला लकी; चौकार अन् विकेट्सने फिरवले सामन्याचे वातावरण

वानिंदू हसरंगा सध्या क्रिकेटमध्ये त्याची छाप सोडत आहे.
हसरंगासाठी 4 नंबर ठरला लकी; चौकार अन् विकेट्सने फिरवले सामन्याचे वातावरण
Wanindu HasarangaDainik Gomantak
Summary

वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) सध्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवत आहे. आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ आरसीबीचा तो एक भाग होता आणि त्याने IPL मधून 26 विकेट्सही घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (SL vs AUS) त्याने मंगळवारी फलंदाजी करताना सलग 5 चेंडूत 5 चौकार मारले. वानिंदूने 195 च्या स्ट्राईक रेटने 37 धावा केल्या. (Vanindu Hasaranga is currently making his mark in cricket)

त्यानंतर या लेगस्पिनरने 58 धावांत 4 आऊटही घेतले. ही त्याची वनडेमधील सर्वोत्तम कामगिरी आहे, त्याला प्रथमच 4 विकेट घेण्यात यश आले आहे. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. रोमहर्षक सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सने विजय नोंदवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच याआधी त्याने टी-20 मालिकाही 2-1 अशी जिंकली होती.

Wanindu Hasaranga
ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने केला नवा राष्ट्रीय विक्रम

वानिंदू हसरंगा फलंदाजीला आला तेव्हा खेळायला 25 चेंडूच बाकी होते. श्रीलंकेने 45.5 ओव्हरमध्ये 6 आऊट 258 धावा केल्या. अशा स्थितीत 300 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला वेगवान धावा करण्याची जास्त गरज होती. हसरंगाने 49व्या षटकात झ्ये रिचर्डसनच्या पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारले तर त्याने ओव्हरमध्ये एकूण 22 धावा दिल्या. त्यानंतर 50 व्या ओव्हरमध्ये त्याने हेझलवूडवरही चौकार ठोकला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो आऊट झाला. त्याने 19 चेंडूत 37 धावा केल्या आहेत तर 6 चौकार देखील मारले. त्याने केवळ चौकारावरून 24 धावा केल्या.

मात्र, पावसामुळे ऑस्ट्रेलियाला 44 ओव्हरमध्ये 282 धावांचे लक्ष्य मिळाले. वानिंदू हसरंगाने कांगारू संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचला प्रथम आऊट केले. तर त्याने 41 चेंडूत 44 धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टेनिस आणि अॅलेक्स कॅरी यांच्याही विकेट घेतल्या. स्टॉइनिसने 31 चेंडूत 44 तर कॅरीने 22 चेंडूत 21 धावा केल्या. पॅट कमिन्स हा 2 चेंडूत शून्य धावा काढून हसरंगाचा चौथा आऊट ठरला.

या सामन्याआधी 24 वर्षीय हसरंगाने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 विकेट घेतल्या होत्या. 15 धावांमध्ये 3 आऊट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वेळी, 26 च्या सरासरीने 546 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतकेही झळकावण्यात आली. त्याने नाबाद 80 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

या सामन्यात प्रथम खेळताना श्रीलंकेने 7 विकेट्सवर 300 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने नाबाद 86 धावा केल्या. याशिवाय पथुम निसांकाने 56 आणि दनुष्का गुनाथिलकाने 55 धावा केल्या. एस्टर एगर आणि मार्नस लॅबुशेनने 2-2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 42.3 ओव्हरमध्य़े 8 विकेट्सच्या मोबदल्यात टारगेट गाठले. ग्लेन मॅक्सवेल 51 चेंडूत 80 धावा करून नाबाद राहिला तर त्याने यावेळी 6 चौकार आणि 6 षटकार मारले. आणि तो सामनावीर ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com