Goa Professional League : वास्कोची वेळसाव क्लबवर मात

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

वास्को स्पोर्टस क्लबने रविवारी चुरशीच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल लढतीत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 3 - 2 फरकाने निसटता विजय नोंदविला.

पणजी : वास्को स्पोर्टस क्लबने रविवारी चुरशीच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल लढतीत वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 3 - 2 फरकाने निसटता विजय नोंदविला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

वेळसाव क्लबला चौथ्या रॉनिल आझावेदो याने आघाडी मिळवून दिली, नंतर डेसमॉन गामा याने बरोबरीचा गोल केल्यानंतर डेनिल रिबेलो आणि अनिल गावकर यांच्या गोलमुळे वास्को क्लबने दमदार आघाडी प्राप्त केली. ब्रायन मस्कारेन्हास याने नंतर वेळसाव क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली.

ISL 2020-21 : हैदराबादला गोलशून्य बरोबरीत रोखून एफसी गोवा प्ले-ऑफ फेरीत दाखल

वास्को क्लबचा पाच सामन्यातील चौथा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे आता 12 गुण झाले असून अव्वल क्रमांकही मिळाला आहे. वेळसाव क्लबला चौथ्या पराभवामुळे पाच लढतीनंतर एका गुणावर कायम राहावे लागले.

स्पर्धेत सोमवारी (ता. 1) धुळेर-म्हापसा येथील स्टेडियमवर साळगावकर एफसी व धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात लढत होईल.

संबंधित बातम्या