वास्कोची सेझा फुटबॉल अकादमीवर 1-0 फरकाने निसटती मात
Vasco Sports Club earned a full three points in the Goa Professional League football tournament

वास्कोची सेझा फुटबॉल अकादमीवर 1-0 फरकाने निसटती मात

पणजी : वास्को स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. सेझा फुटबॉल अकादमीवर 1-0 फरकाने निसटती मात करून त्यांनी स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. अनुभवी आघाडीपटू आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्योकिम अब्रांचिस याने सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना गोल वास्को क्लबसाठी निर्णायक ठरला. सामन्याच्या 86व्या मिनिटास अनिल गावकर याच्या असिस्टवर ज्योकिमने गोल केला. अनिलच्या लाँग पासवर ज्योकिमने चेंडूसर सेझा अकादमीच्या पेनल्टी क्षेत्रात धडक दिली, यावेळी त्याची प्रतिस्पर्धी गोलरक्षकाची टक्कर झाली, मात्र चेंडू गोलरेषा ओलांडून गेला. रेफरीने सहाय्यक रेफरीशी सल्लामसलत करून गोल वैध ठरविला.

सामन्याच्या 14व्या मिनिटास वास्कोस आघाडी घेण्याची संधी होती, मात्र त्यांचा अनुभवी खेळाडू फ्रान्सिस फर्नांडिसचा फटका गोलपोस्टमुळे विफल ठरला. अर्ध्या तासाच्या खेळानंतर वास्कोच्या देमॉन गामा याचा फटका सेझा अकादमीचा गोलरक्षक रोनाल गांवकार याने चपळाईने अडविला. त्यानंतर मायरन बोर्जिसच्या फ्रीकिकवर समीर कश्यप याने संधी दवडल्यामुळे सेझा अकादमीस गोलपासून दूर राहावे लागले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com